Rudraprayag Accident : उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग जिल्ह्यातून एका मोठ्या अपघाताची बातमी आली आहे. येथे एक टेम्पो ट्रॅव्हलर मिनी बस अलकनंदा नदीत पडली. या अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. तर 12 जणांची सुटका करण्यात आली. अनेकांची प्रकृती गंभीर आहे. तर काही लोक अजूनही अडकून पडले आहेत.
मिनी बसमध्ये २६ प्रवासी होते असे सांगण्यात येत आहे. जखमींना हेलिकॉप्टरने उपचार केंद्रात नेण्यात येत आहे. गुप्तकाशीहून हेलिकॉप्टरने रुद्रप्रयागला पोहोचले. चार जखमींना हेलिकॉप्टरने एम्समध्ये नेण्यात आले आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, रुद्रप्रयाग शहरापासून पाच किलोमीटर पुढे बद्रीनाथ महामार्गावरील रायतोलीजवळ एक टेम्पो ट्रॅव्हलर मिनी बस अलकनंदा नदीत पडली.
माहिती मिळताच पोलीस प्रशासन, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन, डीडीआरएफ आणि इतर पथक घटनास्थळी बचाव कार्य करत आहेत. येथे रेल्वे मार्गावर काम करणाऱ्या तीन जणांनी स्वत:ला वाचवण्यासाठी उडी घेतल्याचे सांगण्यात येत आहे, त्यापैकी एकाचा मृत्यू झाला.
pic.twitter.com/Ra8Nzz25cL
— Dilip (@dilipyadav_10) June 15, 2024
BIG BREAKING
So far, 8 people have died after a Tempo Traveller fell into the Alaknanda River. This accident happened near Rudraprayag on the #Badrinath Highway.#Encounter#Berojgaar_Haryana#t20inUSA
सीएम धामी यांनी अपघाताबद्दल शोक व्यक्त केला आहे
अपघाताच्या वृत्तावर शोक व्यक्त करताना मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी म्हणाले की, टेम्पो ट्रॅव्हलरच्या अपघाताची अत्यंत वेदनादायक बातमी मिळाली. स्थानिक प्रशासन आणि SDRP टीम मदत आणि बचाव कार्यात गुंतलेली आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या वैद्यकीय केंद्रात पाठवण्यात आले आहे. या घटनेची चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.