मालेगाव – चंद्रकांत गायकवाड
मालेगाव येथील अकोला रोड आय.एम.ए. हॉल समोर यशोदाई निवास येथील पुष्पक अनिल बळी व सोमेश अनिल बळी या दोन भावंडांनी बाजूलाच राहत असलेल्या गणेश सोनवणे या बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर नोकरी करत असलेल्या कुटुंबातील पावणे दोन वर्षाचा मुलगा,गणेश सोनवणे व त्यांची पत्नी साक्षी सोनवणे यांना घरगुती विद्युत मीटर मधील अर्थिंगला फुल करंटाला स्पर्श झाल्याने सोनवणे कुटुंबावर वेळ आली होती पण काळ आला नव्हता या ओवी नुसार हृदयस्पर्शी प्रसंग आला होता.
याबाबत सर्विस्तर वृत्त असे की, विदर्भ पब्लिक स्कूल मालेगावला शिकत असलेला वर्ग दहावीचा पुष्पक व इयत्ता सातवी ला शिकत असलेला सोमेश या दोन मुलांनी सर्वप्रथम गणेश सोनवणे यांचा पावणे दोन वर्षाचा मुलगा आर्थिंग करंटला चिपकला त्याला सोडवण्यासाठी त्याचे वडील अर्थात गणेश सोनवणे भांबावल्यामुळे आंर्थिंग तार उपटायला गेले तेही विद्युत करंटला चिपकले, त्यांच्या पत्नीने हे दृश्य पाहिले असता त्या मुलाला उचलायला गेल्यात त्याही त्या ताराला चिपकल्या हे दृश्य पाहून बाजूला वरील दोन भावंडे क्रिकेट खेळत असता जोरात आरडा ओरड करून आजूबाजूच्यांना बोलावले वडील अनिल बळी व आई सौ.सविता विदर्भ पब्लिक स्कूलचे शिक्षक पंकज लांचुरे, शेजारी गोपाल शिंदे,
शिक्षक विठ्ठल बळी इत्यादी लोक सोमपुष्प च्या ओरडण्यामुळे त्वरित जमा झाले, पुष्पक व सोमेश नी तोपर्यंत समयसूचकते नुसार आपली क्रिकेट खेळण्याची जिवलग बॅट व स्टंप बाजूच्या दगडावर आपटून फोडले व करंट लागलेल्या तिघांनाही करंटग्रस्त आंर्थिंग पासून दूर केले, सुदैवाने तिघांचेही प्राण वाचले. सिरीयस असलेल्या गणेश सोनवणे यांचा जवळपास श्वास बंद होण्याच्या मार्गावर असताना प्रथमोपचार म्हणून हृदय पंपिंग व आणखीन काही प्रयोग केल्यामुळे त्यांचा जीव वाचला.
डॉक्टर भगीरथ जाजू म्हणजेच 24 तास सेवा देणारे माणसातील देव होय सद्यस्थितीत बाळाची व आईची तब्येत चांगली असून वडील गणेश सोनवणे यांना मालेगावातील 24 तास सेवा देणारे डॉक्टर भगीरथ जाजु यांनी उपचार केले त्यामुळे त्यांची तब्येत धोक्याच्या बाहेर आहे. चिमुकल्या पुष्पक व सोमेश च्या समय सूचकतेमुळे सर्व स्तरातून त्यांचे कौतुक केल्या जात असून काही स्वयंसेवी संस्थेकडून त्यांचा सत्कार व गौरवही केल्या गेला आहे.