Former CM BS : कर्नाटक भाजपच्या नेत्या विरुद्ध लैंगिक शोषणाच्या घटना समोर येत आहे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते बीएस येडियुरप्पा यांच्या विरुद्ध पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. त्यांनी एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी न्यायालयाने त्याच्याविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले आहे. लैंगिक अपराध बाल संरक्षण कायदा (POCSO) प्रकरणात न्यायालयाने ही कारवाई केली आहे. याप्रकरणी पोलीस आता येडियुरप्पाला अटक करणार आहेत.
बेंगळुरू न्यायालयाने गुरुवारी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांच्याविरुद्ध POCSO प्रकरणात अजामीनपात्र वॉरंट जारी केले. त्याच्याविरुद्ध पोक्सो कायदा आणि आयपीसी कलम 354A (लैंगिक छळ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 17 वर्षीय मुलीच्या आईने सांगितले की, माजी मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या घरी त्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केले.
सीआयडीने माजी मुख्यमंत्र्यांना समन्स बजावले होते
या प्रकरणी सीआयडीने बुधवारी माजी मुख्यमंत्र्यांना चौकशीसाठी बोलावले होते. यावर बीएस येडियुरप्पा यांच्या वकिलांनी सीआयडीसमोर हजर राहण्यासाठी एका आठवड्याची मुदत मागितली होती, मात्र त्यापूर्वीच त्यांच्या अडचणी वाढल्या. न्यायालयाने आज त्याच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी केले.
जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण
पीडित मुलीच्या आईने 14 मार्च रोजी सदाशिवनगर पोलिस ठाण्यात येडियुरप्पा विरोधात तक्रार दाखल केली होती. तिने तक्रारीत म्हटले आहे की, 2 फेब्रुवारी रोजी ती आपल्या मुलीसह भाजप नेत्याच्या घरी काही मदतीसाठी गेली होती. यावेळी त्याने मुलीचा लैंगिक छळ केला. या प्रकरणी पोलिसांनी येडियुरप्पा यांच्यावर पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
माजी मुख्यमंत्र्यांनी काय दिले स्पष्टीकरण?
याप्रकरणी स्पष्टीकरण देताना येडियुरप्पा म्हणाले की, एक महिला रडत घरी आली होती. त्यांची अडचण ऐकून त्यांनी स्वत: आयुक्तांना फोन करून मदत करण्यास सांगितले. तीच महिला आता त्याच्या विरोधात बोलत आहे. या विरोधात माजी मुख्यमंत्र्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
#WATCH | A non-bailable warrant issued against former Karnataka CM and senior BJP leader B.S. Yediyurappa, in connection with a POCSO case.
— ANI (@ANI) June 13, 2024
Victim's lawyer, Advocate S Balan says, "…I never met anyone from the Government or Police or anybody else. It's purely a private case,… pic.twitter.com/p6qex2PofA