अकोला – संतोषकुमार गवई
जिल्ह्यात यंदा मृग बहार कालावधीत संत्रा, लिंबू,पेरू, डाळिंब व मोसंबी या फळपीकांसाठी पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजना राबविण्यात येत असून, अधिकाधिक शेतकरी बांधवांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी केले आहे.
योजनेच्या अंमलबजावणीसाठी युनिवर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स कंपनीची नियुक्ती झाली आहे. कंपनीचा पत्ता – १०३, पहिला मजला एमएआयडीसी, आकृती स्टार, सेंट्रल रोड, अंधेरी (पूर्व) – मुंबई ४०००९३ असा व दूरध्वनी क्रमांक १८०० २२४०३०/१८०० २००४०३०, तसेच ई-मेल पत्ता [email protected] असा आहे.
अधिसूचित क्षेत्रात अधिसूचित फळपिके घेणारे शेतकरी व कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत.
संत्रा व मोसंबी
संत्रा व मोसंबी या दोन फळपीकांसाठी विमा संरक्षित रक्कम हेक्टरी एक लक्ष व शेतक-यांनी भरावयाचा पीक विमा हप्ता 5 हजार रू. आहे. मोसंबीसाठी पातूर तालुक्यातील पातूर महसूल मंडळ अधिसूचित आहे. संत्रा पीकासाठी बार्शिटाकळी, मूर्तिजापूर, अकोट, तेल्हारा व पातूर या तालुक्यांतील राजंदा, धाबा,बार्शीटाकळी,पिंजर,महान,खेर्डा,निम्भा, कुरुम, हातगाव, अकोलखेड, उमरा, पणज, अकोट, अडगाव बु., हिवरखेड, माळेगाव बाजार,तेल्हारा, पातूर, आलेगाव आदी मंडळांचा समावेश आहे.
लिंबू
लिंबू पीकासाठी विमा संरक्षित रक्कम हे. 80 हजार व विमा हप्ता 4 हजार रू. आहे. अधिसूचित क्षेत्रात अकोला, बार्शिटाकळी, मुर्तिजापूर, अकोट, तेल्हारा, पातूर व बाळापूर या तालुक्यांतील शिवणी, सांगळूद, बोरगावमंजू, कौलखेड, कापशी रोड, राजंदा, धाबा, महान, खेर्डा बु., बार्शीटाकळी, पिंजर, निंबा, जामठी बु., कुरुम, मुर्तिजापूर, हातगाव,अकोलखेड, आसेगाव बाजार,उमरा, पणज, मुंडगाव, अकोट,अडगाव बु., हिवरखेड, माळेगाव बाजार,पातुर, बाभूळगाव,आलेगाव,सस्ती, चान्नी, वाडेगाव, बाळापूर, व्याळा आदी महसूल मंडळाचा समावेश आहे.
डाळिंब
डाळिंब पीकासाठी अकोला तालुक्यातील शिवणी हे महसूल मंडळ अधिसूचित असून, विमा संरक्षित रक्कम हे. एक लक्ष 60 हजार व हप्ता 8 हजार रू. आहे.
पेरू
पेरू पीकासाठी विमा संरक्षित रक्कम हे. 70 हजार रू. असून, हप्ता 3 हजार 500 रू. आहे. पेरूसाठी पातूर तालुक्यातील पातूर महसूल मंडळ अधिसूचित आहे.
अधिक माहितीसाठी उपविभागीय, तसेच तालुका कृषी कार्यालये, कृषी विभाग व विमा प्रतिनिधींशी संपर्क साधावा व विमा योजनेत सहभागी होऊन फळपीक संरक्षित करावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांनी केले आहे.