रामटेक – राजु कापसे
तिर्थक्षेत्र अंबाळा रामटेक येथे भारतीय जनसेवा मंडळ रामटेक,अंबाळा येथील ब्राह्मण वृंद तसेच रामटेक येथील जनतेच्या सहकार्याने 16 जूनला दुपारी 4 वाजता अगस्ती ऋषी आश्रम येथून जोत प्रज्वलित करून गड़मन्दिर, पापदुपेश्वर वार्ड, शास्त्री वार्ड, गांधी चौक वरुण अंबाळा येथे ज्योत पोहचेल. सायंकाळी 5 वाजेपासुन ब्राह्मण वृंदाच्या स्रोत्र पठनाने गंगा दशहरा महोत्सव ची सुरूवात होईल. सायंकाळी 7 वाजता महाआरतीच्या गजरात अंबाळा तलावाच्या मधभागी विसर्जन होईल. यावेळी तलावाच्या मधभागी भव्य आतिश बाजी होईल.
खंडीत गंगा दशहरा महोत्सवाची सुरुआत अनेक वर्षापूर्वी स्वर्गीय संत गोपाल बाबा यांनी केली होती. त्यांच्या निधनानंतर त्यांचे शिष्य तुकाराम बाबा यांनी परंपरा चालू ठेवली. संत तुकाराम बाबाच्या निधनानंतर आता ही परंपरा भारतीय जनसेवा मंडळ रामटेक,अंबाळा येथील ब्राह्मण वृंद तसेच रामटेक येथील जनतेच्या सहकार्याने चालू आहे. अंबाळा तीर्थक्षेत्र विदर्भाची काशी म्हणून प्रशिध आहे.