गोंदिया – महेंद्र कनोजे
एकोडी. दि,12जुन तिरोडा तालुक्यातील पालडोंगरी येथील शेतकऱ्यावर प्रशासनच़ी जबरदस्ती पोलिसांनी त्याच्याच शेतातून बळजबरीने काढला बाहेर शेतकरी असुन आरोपी असल्याचे पोलिसांकडून वागणूक दिली जात आहे त्याच्या एक व्हिडिओ सामोर आला आहे गेल इंडिया कंपनीची पाईपलाईन टाकण्याच्या काम या भागात सुरू आहे ही पाईपलाईन शेतकऱ्याच्या शेतातून टाकले जात आहे तर याच कंपनीचा सब स्टेशन तयार करण्यासाठी तिरोडा तालुक्यातील पालडोंगरी येथेल बोपचे यांच शेत बळजबरीने इसकावण्याच्या काम कंपनी करत असल्याचा आरोप शेतकरी करीत आहे.
गेंदलाल बोपचे चिंदु बोपचे हे दोघे भाऊ असून त्यांच्याकडे वडीलोपाजित पावणे चार एकर शेती आहे याचं शेतीत थांबुन आपल्या परीवारचा उदरनिर्वाह करतात मात्र आता गेल इंडिया कंपनी यांच्या शेतात बळजबरीने सब स्टेशन तयार करण्यासाठी दीड एकर जमीन अधिग्रहण करत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे पण बोपचे यांना ती जमीन विकायची नाही ज्या काळ्याआईने आजपर्यंत त्याच पोट भरले तीला विकुन ते रस्त्यावर येतील म्हणून त्यांनी विरोध केला पण कंपनीने बळजबरीने जमीन मोजमाप करण्यासाठी पोलिस प्रशासन सोबत घेत शेतकरयांना त्यांच्याच शेतातून बळजबरीने बाहेर काढले जात आहे.
यांचा विडियो देखील वायरल झाला आहे जणू हे शेतकरी नसुन आरोपी आहेत अशी वागणूक पोलिसांनी शेतकऱ्यांना दिली शेतकरी कुटुंबात 12 सदस्य असून इच्छा मरणाची परवानगी जिल्हा अधिकारी यांना मागीतली आहे अशी माहिती पञकाराशी बोलताना आज 12 जुनं रोजी दिली आहे पोलिसांच्या कारवाईचा विडिओ सोशल मीडिया वर चांगलाच वायरल होत आहे,