Sunday, December 22, 2024
HomeBreaking NewsRamoji Rao | रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव यांचे निधन...

Ramoji Rao | रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव यांचे निधन…

Ramoji Rao : रामोजी फिल्म सिटी आणि ईनाडूचे संस्थापक रामोजी राव यांचे शनिवारी निधन झाले. ते 87 वर्षांचे होते. शुक्रवारी त्यांची प्रकृती खालावल्यानंतर त्यांना त्यांच्या फिल्मसिटी येथील घरातून खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे वृत्त आहे. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्रकृती अधिकच खालावली. शनिवारी पहाटे ३.४५ च्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

रामोजी राव यांचे पूर्ण नाव चेरुकुरी रामोजी राव होते. त्यांचा जन्म 16 नोव्हेंबर 1936 रोजी आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील पेड्डापरुपुडी येथे झाला. देशातील व्यवसाय, प्रसारमाध्यमे आणि चित्रपट निर्मिती या क्षेत्रांतील महत्त्वपूर्ण योगदानासाठी ते ओळखले जातात. त्यांनी रामोजी ग्रुपची स्थापना केली, ज्यामध्ये फिल्म स्टुडिओ रामोजी फिल्म सिटी व्यतिरिक्त, ईटीव्ही नेटवर्क, डॉल्फिन हॉटेल्स, मार्गदर्शी चिटफंड आणि ईनाडू तेलुगू वृत्तपत्र यांचा समावेश आहे. 2016 मध्ये त्यांना शिक्षण, पत्रकारिता आणि साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

रामोजी फिल्म सिटीची स्थापना 1996 मध्ये झाली, ती जगभर प्रसिद्ध आहे.
प्रसिद्ध दक्षिण भारतीय चित्रपट निर्माते आणि पद्म पुरस्कार विजेते रामोजी राव यांनी 1996 मध्ये या फिल्म सिटीची स्थापना केली होती. चित्रपट निर्मितीशी निगडीत अडचणी पाहून त्यांनी अशा फिल्म सिटीची कल्पना केली होती, ज्यामध्ये चित्रपट निर्माते येथे फक्त स्क्रिप्ट घेऊन येतात आणि संपूर्ण चित्रपट बनवून घेऊन परत जातात, असे म्हणतात. येथे दरवर्षी सुमारे 200 चित्रपटांचे चित्रीकरण येथे होते. आत्तापर्यंत येथे सुमारे 2000 चित्रपटांचे चित्रीकरण झाले आहे.

यात हिंदी, भोजपुरी, तेलुगु, तमिळ, कन्नड, मल्याळम, बंगाली, ओरिया आणि इतर भाषांमधील चित्रपटांचा समावेश आहे. क्रिश-३, जय हो, रोबोट, किस्मत कनेक्शन, सरकार राज, गोलमाल, हिम्मतवाला, चेन्नई एक्सप्रेस आणि दिलवाले इत्यादी हिंदी चित्रपटांचा समावेश आहे. बाहुबली चित्रपटाच्या दोन्ही भागांचे शूटिंग येथे पूर्ण झाले.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: