नांदेड – महेंद्र गायकवाड
बिलोली तालुक्यातील अजनी येथे मामाच्या गावी राहत असलेल्या एका अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार करणाऱ्या यादव बंडाभोई बट्टलवाड वय (50)वर्ष या नराधमास बिलोली येथील तदर्थ जिल्हा न्यायधीश -1 तथा अति. जिल्हा न्यायधीश श्री.व्ही.ब. बोहरा यांनी पंचवीस वर्ष सश्रम करावासाची शिक्षा व दंड ठोठावाल आहे.
घटनेची थोडक्यात हकीकत अशी की, यातील पीडित मुलीची आई लहानपणी वारली असल्याममुळे तिच्या वाडिलानी दुसरे लग्न केले. त्यामुळे पीडिता मामाच्या गावी अजनी ता. बिलोली येथे आजी आजोबा आणि मामा सोबत राहत होती. माहे ऑक्टोबर 2020 मध्ये पीडितेची मावशी बाळंतपनासाठी माहेरी आजनी येथे आली व दिनांक 28/11/2020 रोजी पीडित मुलीची मावशी च्या पोटात दुखत असल्याने पीडितेचे आजी आजोबा मामा यांनी पीडितेच्या मावशीला लोहगाव येथे सरकारी दवाखान्यात घेऊन गेले.
व दि. 29/11/2020 रोजी पीडितेच्या मावशीला मुलगी झाली. त्यामुळे पीडितेचे आजी आजोबा दवाखान्यात होते. व दि. 01/12/2020 रोजी दुपारी पीडितेचे मामा पीडितेला शेताकडे जाऊन जनावरांना चारा पाणी कर असे सांगून तो देखील दवाखान्यात लोहगाव येथे गेला. त्यामुळे पीडित मुलगी मामाच्या सांगण्यावरून शेताकडे जनावरांना चारा पाणी करण्यासाठी गेली असता.
पीडित मुलीच्या आजी आजोबांच्या शेताच्या बाजूला बांधाला लागून चुलत आजोबा यादव बंडाभोई बट्टलवाड यांचे शेत होते व शेतात यादव बट्टलवाड होता. पीडित मुलगी एकटी पाहून आरोपी यादव बट्टलवाड याने आजी आजोबा कुठे आहेत असे विचारले व त्यावर पीडित मुलीने आजी आजोबा आणि मामा लोहगाव येथे मावशी बाळंतीण झाली त्यामुळे दवाखान्यात गेलेत असे सांगितले तेंव्हा आरोपी यादव बंडाभोई बट्टलवाड याने पीडित मुलीचे तोंड दाबून धरून तिथेच आडवे पाडून शेतातच लैंगिक अत्याचार केला. व त्यानंतर पुढील महिनाभर शेतात कोणी नसल्याचे पाहून पाच सहा वेळेस आत्याचार केला आणि कोणाला संगल्यास मारुन टाकतो अशी धमकी दिली. त्यामुळे पीडित मुलीने घडलेली घटना कोणालाही सांगितली नाही.
त्यानंतर चार पाच महिन्यांनी पीडित मुलीचे पोट वाढल्याने आजी आजोबा यांनी विचारल्यावर घडलेली हकीकत पीडित मुलीने त्यांना सांगितली. यावरुन दि. 28/07/2021 रोजी बिलोली पोलीस स्टेशन येथे आरोपी विरुद्ध तक्रार दिली. पीडित मुलीच्या तक्रारीवरून आरोपी विरुद्ध कलम 376(2)(N), 506 भा. द. वि. आणि कलम 4,6,10 पोक्सो. नुसार पो. स्टे. बिलोली येथे गुन्हा दाखल झाला. सदरील गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक अनिल सनगल्ले यांनी पूर्ण करुन दोषारोप पत्र मा. अति. सत्र न्यायालय बिलोली येथे दाखल केले होते.
सदरील गुन्ह्यामध्ये सरकारतर्फे एकूण 9 साक्षीदार तपासण्यात आले. व. मा. न्यायालयासमोर आलेल्या साक्षी पुराव्याचा विचार करून तसेच मा. सहाय्यक सरकारी अभियोक्ता यांचा युक्तिवाद ग्राह्य धरुन मा. न्यायाधीश यांनी 6 जून 2024 रोजी कलम 376(2)(N), भा.द. वि. आणि कलम 4,6,10 पोक्सो. अंतर्गत 20 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा व दंड रु. 25,000/- व दंड न भरल्यास 6 महिने सश्रम कारावासाची शिक्षा आणि कलम 506 भा.द. वि. अंतर्गत 5 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा व दंड रु. 5,000/- व दंड न भरल्यास 6 महिने सश्रम कारावासाची शिक्षा आरोपीस ठोठावली.
सरकारतर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता संदीप भिमराव कुंडलवाडीकर यांनी बाजू मांडली. सदर प्रकरणात तात्कालीन पोलीस उपनिरीक्षक अनिल सनगल्ले यांनी तपास पूर्ण केला. मदतनीस पोलीस नाईक बादेवाड तसेच पैरावी अधिकारी पोलिस हेडकॉन्स्टेबल एम. ए. शेख (ब. न. 1870) पो. स्टे. बिलोली यांनी सहकार्य केले.