Sunday, December 22, 2024
Homeराज्यसमृद्धी महामार्गावर उभ्या ट्रकला कारची धडक...कार मधील तिघे ठार...मृतक अमरावती येथील पराडाईज...

समृद्धी महामार्गावर उभ्या ट्रकला कारची धडक…कार मधील तिघे ठार…मृतक अमरावती येथील पराडाईज कॉलनीचे रहिवाशी..

मालेगाव (वाशिम) – चंद्रकांत गायकवाड

मालेगाव ता 3 बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर चॅनल क्र .239 नागपूर कॉरिडोर, मालेगाव एक्झीट जवळ कारने उभ्या ट्रकला मागून दिलेल्या धडकेने कार मधील तिघे जण ठार झाले आज ता3 रोजी सकाळी 7.05 वाजताच्या दरम्यान हा अपघात झाला.

क्रेटा कार एम एच 27बी व्ही 2739 ने उभ्या ट्रक क्र.एम एच 15 जे सि 9695 ला मागून धडक दिली होंडाई क्रेटा कार संभाजीनगर वरून अमरावती कडे जात असताना ट्रक क्र.एम एच 15 जे सी 9695 हा रोडच्या साईडला उभा असताना होंडाई कार स्पीड ने येऊन ट्रकला मागून धडकली कार मध्ये तीन इसम होते त्यामध्ये शदाब रईस काझी (वय 47 वर्षं ) आलम हुसेन अ सिद्दीकी (वय 40 वर्षे ) होते हे तिघेही ठार झाले ते अमरावती येथील पराडाईज कॉलनी मध्ये राहत होते.

अपघात स्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक दांदडे पोलीस उप निरीक्षक मोरे यांचेसह मालेगाव पोलीस ठाण्याचे कर्मचारी पोलीस हेड कॉन्स्टेबल निलेश अहिर ,ज्ञानेश्वर सानप ,पोलीस उपनिरीक्षक राहुल गंधे,दिलीप राहाटे ,महादू पेटकर ,सहाय्यक पोलीस उप निरीक्षक कैलास कोकाटे ,पोलिस हेड कॉन्स्टेबल सुनिल पवार ,अमोल पवारआदी घटनास्थळी हजर होते.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: