मूर्तिजापूर – नेपाळमधील छापा येथे संपन्न झालेल्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत येथील परमानंद मालाणी शाळेतील पाचवीचा विद्यार्थी विनय मिलींद जामनिक याने गोल्ड मेडल प्राप्त केले आहे. क्रीडा क्षेत्रात नावलौकिक प्राप्त येथील एम बी कराटेची चमू नेपाळ मध्ये संपन्न झालेल्या शितो रिई कराटे आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरल्यानंतर एम बी कराटेचे संचालक सेंसई गंगाधर जाधव यांच्या नेतृत्वात येथील विविध शाळांचे विद्यार्थी या स्पर्धेत ३१ मे व १ जून रोजी सहभागी झाले.
या स्पर्धेत आपल्या अतुलनीय कौशल्याचे प्रदर्शन करून विनय ने घवघवीत यश संपादन केले. आपल्या यशाचं श्रेय त्याने वडील पत्रकार मिलींद जामनिक,आई शिल्पा जामनिक आजी गयाबाई जामनिक, आत्या, आत्येमामा, भाऊ मुख्याध्यापक,शिक्षक प्रशिक्षक सेंसई गंगाधर जाधव यांना दिले. त्याच्या यशाबद्दल त्याचे यांनी जेष्ठ पत्रकार प्रा.अविनाश बेलाडकर, गजानन इंगळे, ॲड नितीन जामनिक,रोहीत सोळंके, डॉ. आशिष चक्रनारायण सचीन आंबेकर,बंडू जामनिक यांनी अभिनंदन केले आहे.