Sunday, December 22, 2024
Homeराज्यमूर्तिजापूर | तहसील कार्यालय परिसरात पार्किंगचे तीन-तेरा..!

मूर्तिजापूर | तहसील कार्यालय परिसरात पार्किंगचे तीन-तेरा..!

तहसीलदारांच्या दालनापर्यंतच कर्मचारी करतात अवैद्य पार्किंग.

सुरक्षारक्षक नेमण्याची गरज.

मूर्तिजापूर – तहसील कार्यालयाच्या आवारात बेशिस्त पार्किंगमुळे मोठ्या प्रमाणात वाहनांची कोंडी होत आहे. मिळेल तेथे वाहन उभे करून चालक निघून जात असल्याने वाहने अडकून पडण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे वाहनचालक कार बाहेर काढण्यासाठी हॉर्न वाजवून ध्वनिप्रदूषण करतात. या बेशिस्त वाहन पार्किंगवर तोडगा काढण्याची गरज आहे.

तहसीलदार कार्यालयाच्या आवारात वाहनांची संख्या वाढत आहे. त्यावर नियंत्रण मिळविणे प्रशासनाला अवघड जात आहे. तहसीलदार कार्यालयातच दस्त नोंदणी कार्यालय असल्याने दस्त नोंदणीसाठी मोठ्या प्रमाणात वाहने या ठिकाणी येतात. सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत वाहनांची या ठिकाणी पार्किंगसाठी चढाओढ सुरू असते. त्याच वेळेत कार्यालयात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची वाहनेदेखील येतात. मात्र, वाहनांची गर्दी झाल्याने शासकीय वाहनांनादेखील येण्यासाठी जागा शिल्लक राहत नाही.

एवढेच नव्हे तर काही बेशिस्त वाहनचालक हे मुख्य रस्त्यावरच वाहन पार्क करत असल्याने कार्यालयातील गाडी बाहेर काढण्यासाठी जागा शिल्लक राहत नाही. अनेक वाहनचालक गाडी रस्त्यावर उभी करून निघून जात असल्याने पर्यायी मार्गच शिल्लक राहत नाही. वाहन बाहेर पडण्यासाठी मार्ग नसल्याने अनेक वाहनचालक गाडीचा हॉर्न वाजवत आपला संताप व्यक्त करत असतात. हॉर्नच्या आवाजामुळे कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही त्रास सहन करावा लागतो.

अपेक्षा आहे. येथे अधिकारी, कर्मचाऱ्यांची वाहने तहसीलच्या आतील परिसरातच ठेवण्यात येतात. हे तहसील कार्यालय अनेक वर्षांपूर्वीचे आहे. येथे तहसील अधिकृत पार्किंग व्यवस्था करायला हवी. पूर्वी मूर्तिजापूर शहराची लोकसंख्या कमी होती. त्यामुळे त्या लोकसंख्येनुसार, तहसीलचे बांधकाम व परिसराची निर्मिती करण्यात आली होती. परंतु आता मूर्तिजापूर तालुक्याची लोकसंख्या वाढली आहे. त्यामुळे येथे नेहमीच कामानिमित्त लोकांची वर्दळ असते.

नागरिक येथे बेवारसपणे कुठेही वाहने उभी करून निघून जातात. त्यामुळे तहसीलदाराच्या दालनांपर्यंत वाहनांच्या रांगा अस्ताव्यस्त स्थितीत दिसून येतात. एव्हडेच नव्हे तर येथील तहसील कार्यालयातील कर्मचारीही तहसीलदार, नायब तहसीलदारांच्या दालनापर्यंत अनधिकृत पणे आपली वाहने पार्क करतात यावरून अशा कर्मचारी अथवा नागरिकांकरिता नियम आहेत की नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांकरिताही स्वतंत्र वाहतूक व्यवस्था असली पाहिजे. परंतु ते नसल्यामुळे तेसुध्दा वाटेल तेथे वाहने ठेवण्याचा प्रताप करतात. त्यामुळे तालुक्याच्या दंडाधिकाऱ्यांच्या कार्यालयातच जर अशी व्यवस्था असेल तर इतर कार्यलयांचे काय, असा सवाल व्यक्त केल्या जात आहे.

सुरक्षारक्षक नेमण्याची गरज..

सोमवार आणि गुरुवारी तहसीलदारांकडे शेतजमिनीशी निगडित न्यायालय भरविले जात असल्याने त्यावेळीही अनेक वाहने या ठिकाणी येत असतात. त्यावेळीही वाहने बेशिस्तपणे उभी करण्यात येत असल्याने मोठी गैरसोय होते. सर्वच गाड्या थेट तहसीलदार कार्यालयात येत असल्याने वाहने उभी करण्यासाठी पर्यायी जागेची मागणी केली जात आहे. दुसरीकडे या ठिकाणी येणाऱ्या गाड्यांचे योग्य पार्किंग करण्यासाठी सुरक्षारक्षक नेमण्याचीही गरज आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: