रामटेक – राजू कापसे
रामटेक शहरतील आंबेडकर चौक येथे काल दिनांक २३ मे रोजी बुद्ध पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी हजारोंच्या संख्येने बुद्ध उपासक, उपासीका उपस्थित होत्या.
२३ मे ला सायंकाळी ०६.०० वाजता धम्मज्योती बुद्धविहार, आंबेडकर वॉर्ड, रामटेक येथून कँडल मार्च काढण्यात आला. तो शहर भ्रमण करत बसस्टॉप होत आंबेडकर चौक येथे पोहचला. येथे बाबा साहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून नंतर धम्मज्योती बुद्ध विहार येथे कॅन्डल मार्च पोहचला. तेथे महापरित्रान घेण्यात आले व त्यानंतर खिरपुरी वाटप करण्या आली.
यावेळी येथे विनोद राऊत, देवचंद अंबादे,अतुल धमगाये,अमित अंबादे, अरविंद सांगोडे, देवानंद जांभूळकर, विनोद पाटील, उत्कर्ष अंबादे, शुभम इंदोरकर,अनिकेत अंबादे,वैभव कोचे,कुणाल वानखेडे, राज आठवले,श्रविल अंबादे,प्रियांशू अंबादे,आर्य सहारे,आर्यन सांगोडे, वेदांत धमगाये,संकेत सांगोडे, सम्यक सांगोडे,प्रज्वल राहाटे, तनमय राहाटे, आशु अंबादे, शिलाश भैसारे, क्रिश अंबादे, प्रीत धमगाये,अरूष सहारे, पलाश धमगाये, निर्भय सांगोडे यांचेसह हजारोंच्या संख्येने बुद्ध उपासक व उपासिका उपस्थित होत्या.