Wednesday, December 25, 2024
Homeराज्यरामटेक शहरातील शेकडो युवकांनी केला शिवसेनेत प्रवेश...

रामटेक शहरातील शेकडो युवकांनी केला शिवसेनेत प्रवेश…

नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना आमदार जयस्वाल यांच्या हस्ते नियुक्ती पत्र वाटप

रामटेक – राजू कापसे

पक्ष संघटन मजबूत करणारा नेताच कार्यकर्त्यांना आवडत असतो. याच स्वरुपाचे कार्य गेल्या अनेक वर्षापासून रामटेक विधानसभा क्षेत्राचे आमदार ॲड.आशिष जयस्वाल करीत आहेत. हिच त्यांची कार्यशैली पाहता त्यांच्या नेतृत्वाखाली, शिवसेना रामटेक तालुका प्रमुख श्री.विवेक तुरक, शहर प्रमुख श्री.राजेश किंमतकर, माजी नगरसेवक सुमित कोठारी यांच्या उपस्थितीत दि .२४ मे २०२४ रोजी रामटेक शहरातील शेकडो युवकांनी शिवसेनेत प्रवेश केला.

यात रामाळेश्वर वॉर्ड येथिल हर्ष हरणेकर, श्रीराम खोलकुटे,कार्तिक गायधने,श्रिकेश आंबेपवार, आशिष नागपुरे,अमेय तिडके, अथर्व गुप्ता, हर्षल मानकर, परिपोष मेंघरे, निखील येयेवार, पियूष भरणे, आदित्य मेहर, आयुष निरडकर,सुजल येयेवार तर राधाकृष्ण वॉर्ड येथिल मोहीत सोमनाथे,रोशन बावनकुळे,ईश्वर बावनकुळे, हनिष वाघमारे,सागर वाघमारे, प्रजवल शिरसागर,शुभम चौकसे, जोश साठवणे, अमित मानकर, तुषार वाघमारे यांच्यासह युवकांनी शिवसेनेत प्रवेश केला.

तसेच रामटेक शिवसेना शहर कार्यकारणीचे पदाधिकारी नियुक्ती पत्र आमदार आशिष जयस्वाल यांच्या हस्ते देण्यात आले.यात उपशहर प्रमुख – महेश बिसन, विश्वास पाटील,राहुल गुंढरे, शिवसेना विभाग प्रमुख – वसंता अहिरकर,राजेश नानोटे, विनोबा भावे वॉर्ड शाखा प्रमुख – योगेश दुधबर्वे, राधाकृष्ण वॉर्ड शाखा प्रमुख – प्रणय सोमनाथे, उपशाखा प्रमुख रोहित चोले, रामाळेश्वर वॉर्ड शाखा प्रमुख – विलास तांदुळकर, उपशाखा प्रमुख प्रशांत हटवार यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: