Sunday, December 22, 2024
HomeBreaking Newsवाडेगाव पातूर रस्त्यावर चान्नीफाटा पुलावर ट्रक व कारचा अपघात...दोघे गंभीर...गाडी पुलावर लटकल्याने...

वाडेगाव पातूर रस्त्यावर चान्नीफाटा पुलावर ट्रक व कारचा अपघात…दोघे गंभीर…गाडी पुलावर लटकल्याने जखमी

निशांत गवई, पातूर

पातूर – बाळापूर पातूर मार्गावर असलेल्या चान्नी फाटा नजीक शनिवार रोजी सायंकाळी ५ वाजता कठडे नसलेल्या पुलावर धडक झाल्याने मोठा अपघात घडला आहे.या मध्ये अपघातात दोघे गँभिर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार वाडेगाव पोलीस चौकी अंतर्गत येत असलेल्या चान्नी फाटा जवळील पुलावरून पातूरकडून बाळापूर कडे ट्रक क्रमांक जी जे ३६ व्ही ५४८० मध्ये तांदूळ भरलेल्या विरुद्ध दिशेने येणाऱ्या गाडी क्रमांक एम एच ४६ बी क्यू ०५८३ ही गाडी ला धडक देऊन पुलावर लटकलेली होती.गाडीमध्ये असलेले शेख अमीर २४ ,दुसरा हसिफ शहा मेहबुब शहा दोघे रा रिसोड जिल्हा वाशीम
हे दोघे गाडीमध्ये अडकले होते.

अरुद पुलाला कठडे नसल्याने अपघात झाला तर अपघात मूळे दोन्ही बाजूने दीड ते दोन किलोमीटर वाहन च्या ट्राफिक जाम झाली होती.यावेळी उपस्थित असलेले मनीष इंगळे, अतुल महल्ले,विजय सोळंके,जीवन इंगळे,कपिल इंगळे,महेश उजाडे रोहन वेलकर ,दामोदर उजाडे,राहुल इंगळे, निलखंठ अरखराव आदी घटनास्थळी पोहचून त्या दोघांना बाहेर काढून नजीक असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नेऊन उपचार करण्यात आले आहे.यावेळी
रुग्णवाहिका चे डॉ मोहम्मद फैजान , सचिन बारोकार,शेख शहजाद ,विठ्ठल नळकांडे..आदी नी जखमींना तत्काळ उपचारासाठी हलविले.यावेळी चौकीचे समाधान रिठे,पोलीस कर्मचारी विनायक पवार,आदी वाहन चालक मदतीला धावून आले.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: