नांदेड – महेंद्र गायकवाड
स्थानिक गुन्हे शाखेचे दबंग पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांनी मुदखेड तालुक्यातील नागेली शिवारातील शेतात गांजाची लागवड केलेली झाडे व पावडर असा एकूण 58,970 रुपयांचा मुद्देमालासह एका व्यक्तीस ताब्यात घेतले असून त्या व्यक्ती विरुद्ध बारड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बारड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये मुदखेड तालुक्यातील मौजे नागेली शिवारात एका शेतामध्ये एन डी पी एस कायदयाच्या तरतुदीचा भंग करुन अंमली पदार्थ गांजाचे झाडाची लागवड करुन जोपासलेली आहेत अशी खात्रीशिर माहीती स्थागुशाचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांना मिळाली.
त्यानुसार खंडेराय यांनी स्थागुशाचे पोलीस अमंलदार, महसुलचे राजपत्रीत अधिकारी यांना सोबत घेवुन दिनांक 16 मे रोजी मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी, मौजे नागेली ता. मुदखेड शिवारात जाऊन गट नंबर 70 मधील शेतात उसाचे पिकात एकुण 52 लहान मोठे गांजाचे झाडे व गांजाचे पावडर असा एकुण 9 किलो 772 ग्राम लागवड करुन जोपासलेली एकुण किंमती 58,970/- रुपयायांचा मु्देमाल मिळून आल्याने आरोपी नामे साहेबराव रकमाजी गव्हाणे वय 55 वर्ष व्यवसाय शेती रा. बारड ता. मुदखेड जि. नांदेड याचेविरुध्द पोलीस ठाणे बारड येथे गुरनं. 35/2024 कलम 20 (अ) (ब) NDPS ACT प्रमाणे सहा. पोलीस निरीक्षक संतोष शेकडे यांच्या फिर्यादवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधीक्षकअबिनाश कुमार, खंडेराव धरणे, अपर पोलीस अधीक्षक, भोकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय, नायब तहसीलदार विजयकुमार पाटे, सपोनि संतोष शेकडे, संतोष कैदासे, सपोउपनि माधव केंद्रे, पोह गुंडेराव करले, सखाराम नवघरे, पोना संजिव जिंकलवाड, किशन मुळे, पोकॉ देवा चव्हाण, चालक पोकों गंगाधर घुगे, कलीम शेख बालाजी मुंडे स्थागुशा, नांदेड यांनी पार पाडली आहे.