रामटेक – राजू कापसे
शिवस्वराज्य दूध संकलन केंद्राच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय नागलवाडी (वन्यजीव), डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजना आवळेघाट, आकाशझेप फाउंडेशन रामटेक व इंदिरा गांधी शासकीय रुग्णालय, रक्तपेढी नागपूर यांचे संयुक्त विद्यमाने १३ मे रोजी आयोजित रक्तदान शिबिरात २५ व्यक्तींद्वारा शासकीय रुग्णालयातील गरजू रुग्णांच्या निशुल्क सेवेसाठी ऐच्छिक रक्तदान करून मानवतेचा कृतिशील संदेश दिला तसेच केक कापून शिवस्वराज्य दूध संकलन केंद्राचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.
यावेळी आकाशझेपचे सचिव साक्षोधन कडबे यांनी बोलताना, “उन्हाळ्यातील दिवसात रक्ताची वाढती मागणी आणि अपुरा पुरवठा बघता तरुणांनी ऐच्छिक रक्तदान करण्यासाठी पुढाकार घ्यावा” असे आवाहन केले. याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी विष्णू सहारे (सरपंच), वंदनाताई भूर्रे (पोलिस पाटील), नरेश बानेवार (आयसीआयसीआय फाऊंडेशन), रोहिदास चौहान (वनरक्षक), अनिकेत मैंद (संचालक,स्व.दू.सं.केंद्र), शिशुपाल बेदरे (अध्यक्ष वन समिती) हे प्रामुख्याने उपस्थित होते.
या शिबिरात शिशुपाल बेदरे, रोहिदास चौहान, कमलेश राऊत, सतीश राऊत, शिवदास बगमारे, शुभम दुपारे, प्रफुल्ल राऊत, अभिजीत मैंद, राहूल भागडकर, स्वप्नील बेदरे, प्रेम राऊत, अनिकेत मैंद, विशाल राऊत, अरुण राऊत,
अजय राऊत, श्रीजय दुपारे, समीर राऊत, प्रिन्स राऊत, श्यामकुमार राहाटे, पियुष किरपान, संकेत राहाटे, पंकज कारेमोरे, दीपक राऊत, साक्षोधन कडबे यांनी ऐच्छिक रक्तदान केले. आयजीजीएमसीच्या बीटीओ डॉ. मानसी लुळेकर आणि चमूने उत्तमरित्या रक्त संकलन केले.