अकोला : महापालिकेचे विरोधी पक्षनेते काँग्रेसचे नेते साजिद खान पठाण हे सध्या अडचणीत सापडले असून त्यांच्या विरुद्ध वंचित बहुजन आघाडी आक्रमक झाली असून वंचित ने शहरातील विविध भागात तक्रार दिली असून साजिद खान यांच्यावर रात्री उशीरा गुन्हा दाखल झाला आहे. त्यांनीं अकोल्याच्या लोकसभा निवडणूक दरम्यान मौलवी यांना फोनवरुन आंबेडकरांना मतदान करण्याचे अपील का केले? या कारणावरून त्यांना शिवीगाळ करून तसेच वंचित बहुजन आघाडी आणि नेते प्रकाश आंबेडकरांबद्दल अपशब्द वापरले, मौलवी यांना फोनवरून धमक्या दिल्यात. या दोघांची एक कथित ऑडिओ क्लिप देखील वायरल होते आहे, असा आरोप करीत वंचित अकोला जिल्ह्यात चांगलीचं आक्रमक झालीय. मात्र काल रात्री साजिद खान पठाण आणि मौलवी यांनी एक व्हीडिओ सोशल मीडियावर टाकून झालेले संभाषण आमचे नसल्याचे सांगितले.
कालपासून वंचितने साजिद खान पठाण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे तसेच महानगरध्यक्ष गजानन गवई यांच्यासह कार्यकर्त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालय गाठलं अन् साजिद खान पठाण यांच्यावर त्वरित गुन्हे दाखल करण्यात यावे, तसेच अटक करण्यात यावी, अशी मागणी वंचितनं केली आहे. काल दिवसभरात विविध पोलीस ठाण्यात वंचितनं साजिद खान पठाण विरोधात तक्रारी दिल्या. अखेर रात्री उशिरापर्यंत पोलिसांत साजिद खान पठाण यांच्यावर विविध कलमान्वयेनुसार गुन्हे दाखल करण्यात आले. विशेष म्हणजे या अगोदरही त्यांच्यावर दंगली प्रकरणी गुन्हे दाखल आहे, अशी माहिती देखील वंचितनं आपल्या तक्रारीत नोंदवली आहे.
साजिद खान आणि मौलवी म्हणतात…
‘त्या’ कथित ऑडिओ क्लिपवर साजिद खान पठाण म्हणतात की… वायरल ऑडिओ क्लिप आमची नाहीये, जाणिवपूर्वक आम्हाला बदनाम केल्या जात आहे. त्यामुळ कोणीही याकड़ं लक्ष देऊ नये, तर मौलवी यांनी सुध्दा साजिद खान पठाण यांच्याकडून धमक्या आणि शिवीगाळ झाल्या नसल्याचे म्हटले आहे.
साजिद खान पठाण नेमके कोण?
काँग्रेसचे नेते आणि माजी नगरसेवक, अकोला महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेता राहिले आहे. 2019 च्या निवडणुकीत त्यांना अकोला पश्चिम विधानसभा मतदार संघातून काँग्रेसकडून उमेदवारी झाली होती. अवघ्या 2 हजार 662 मतांनी साजीद खान पराभूत झाले. दुसऱ्यांदाही त्यांना काँग्रेसनं अकोला पश्चिम मतदार संघाच्या पोट निवडणुकीत उमेदवारी दिली होती.