Sunday, December 22, 2024
Homeकृषीरामटेक कृ.उ.बा.समीतीच्या उत्पन्नात रेकॉर्डब्रेक वाढ...

रामटेक कृ.उ.बा.समीतीच्या उत्पन्नात रेकॉर्डब्रेक वाढ…

  • आर्थिक वर्ष २३ – २४ मध्ये उत्पन्नात दुपटीने वाढ
  • निव्वळ नफ्यात पाच पटीने वाढ
  • निर्वाचित संचालक मंडळाच्या १० महीन्यांच्या कालावधीत मार्च २०२४ अखेर उत्पन्न २ कोटींच्या वर

राजु कापसे
रामटेक

रामटेक तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उत्पन्नात यावर्षी विक्रमी वाढ झाली असुन मागील आर्थिक वर्षातील उत्पन्नाच्या तुलनेत यावर्षीचे उत्पन्न दुप्पट झाले आहे. आर्थिक वर्ष २०२३-२४ मार्च अखेर रामटेक तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे उत्पन्न २ कोटी ४ लक्ष १२०८५ रुपये झाले असुन ही रेकॉर्डब्रेक वाढ असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समिती रामटेक चे सभापती सचिन किरपान यांनी दिली.

मागील वर्षी एप्रिल २०२३ मध्ये या बाजार समितीसाठी संचालक मंडळाची निवडणूक संपन्न झाली या निवडणुकीत सचिन किरपान यांच्या नेतृत्वाखाली १८ पैकी १४ संचालक निवडून आले होते. त्यानंतर सचिन किरपाण यांची सभापतीपदी सर्वानुमते निवड करण्यात आली होती. दिनांक २२ मे २०२३ रोजी सचिन किरपाण यांचे मार्गदर्शक व नेते, राज्याचे माजी मंत्री सुनील केदार यांच्या मार्गदर्शनात सचिन किरपान यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळ कार्यरत झाले होते. आपल्या १० महिन्यांच्या कार्यकाळात रामटेक तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उत्पन्नात विक्रमी वाढ झाली. मागील वर्षी या बाजार समितीचे उत्पन्न १ कोटी १२ लक्ष ७१३२४ रुपये होते.या उत्पन्नात निव्वळ नफा (वाढवा) २१ लक्ष ६१७०३ रू होता. मात्र यावर्षी हा निव्वळ नफा (वाढवा) १ कोटी १० लक्ष १५७८८ रु एवढा झाला आहे. अपुरी कर्मचारी संख्या, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या रामटेक मुख्य बाजारातील साधन-सुविधांचा अभाव असतानाही येथे कार्यरत अडते व्यापारी व शेतकरी बंधूंच्या विश्वासावर तसेच बाजार समितीच्या कर्तव्य परायण कर्मचाऱ्यांच्या मदतीने हे यश गाठता आले अशी प्रतिक्रिया सभापती सचिन किरपान यांनी व्यक्त केली.

रामटेक बाजार समितीची स्थापना १९७३ साली झाली. बाजार समितीचे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. सुवर्ण महोत्सवी वर्षात रामटेक बाजार समितीच्या निर्वाचित संचालक मंडळाच्या १० महीन्यांच्या अल्प कारकिर्दीत उत्पन्नात विक्रमी वाढ झाली असून याबद्दल सर्व स्तरातून सभापती व संचालक मंडळावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

बॉक्स
सर्वांच्या सहकार्यामुळेच मी हे यश मिळवू शकलो – सभापती किरपान
बाजार समितीचे हे यश रामटेक,मौदा व पारशिवनी तालुक्यातील सर्वच शेतकरी बांधवाचे, समितीचे कार्यक्षेत्रातील अडते-व्यापारी,हमाल-मापाडी यांच्या आमच्यावरील विश्वासाचे फलीत आहे.यासाठी विद्यमान संचालक मंडळाचे भरीव सहकार्य लाभलेले आहे.” शेतकरी हाच आपल्या बाजार समितीचा श्वास आहे, त्यांच्यासाठी सोयी-सुविधा निर्माण करण्यास आम्ही सर्वजन कटिबद्ध आहोत”. विद्यमान संचालक मंडळातील माझ्या सर्वच सन्माननिय सहकार्यांचे मनापासुन आभार मानतो, त्यांच्या भक्कम पाठिंब्यामुळेच सर्व निर्णय सहजरित्या घेता आले. या सर्व वाटचालीत समितीच्या शुभचिंतकांचे, माझ्या हितचिंतकांचे तसेच समितीच्या वरिष्ठ कार्यालयातील अधिकारी व समितीच्या कर्मचाऱ्यांचे महत्व अनन्यसाधारण असल्याचे सभापती सचिन किरपाण यांनी माहिती देतांना सांगीतले.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: