एकोडी, महेंद्र कनोजे
गोंदिया : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीसह मुलगा व सासऱ्याला पेट्रोल टाकून जिवंत जाळणाऱ्या आरोपीला गुरुवारी जिल्हा व सत्र न्यायालयाने दोषी ठरवत फाशीची शिक्षा ठोठावली आहे. गोंदिया शहरातील सूर्याटोला परिसरात १४ फेब्रुवारी २०२३ रोजी ही घटना घडली होती. या प्रकरणावर न्यायमूर्ती एन. बी. लवटे यांनी अंतिम निर्णय सुनावला. किशोर श्रीराम शेंडे (४२, रा. भिवापूर, तिरोडा) असे फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
सविस्तर असे की, किशोर शेंडे हा त्याची पत्नी आरती शेंडे (३०) हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा छळ करीत होता. सततच्या जाचाला कंटाळून आरती शेंडे ही फेब्रुवारी २०२३ मध्ये रामनगर पोलिस ठाणे हद्दीत सूर्याटोला येथे माहेरी आली होती. या गोष्टीचा राग मनात धरून किशोर शेंडे याने १४ फेब्रुवारी २०२३ रोजी भिवापूर येथून अॅक्टिव्हा क्रमांक एमएच ३५-झेड ९७०४ ने आला. येताना त्याने ग्राम चुरडी येथील पेट्रोल पंपावरून एका कॅनमध्ये पेट्रोल खरेदी केले होते. रात्रीची वेळ बघून त्याने घरावर पेट्रोल ओतले. तसेच आरती
फाशीच्या शिक्षेचे पहिलेच प्रकरण
भंडारा जिल्ह्यातून गोंदिया वेगळा करून १ मे १९९९ रोजी गोंदिया जिल्ह्याची निर्मिती झाली. त्यानंतर गोंदियात जिल्हा न्यायालय आले. मात्र, २५ वर्षांच्या या इतिहासात एखाद्या प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आल्याचे हे पहिलेच प्रकरण ठरले असून त्याची कायम नोंद राहणार आहे.
ज्या खोलीत झोपली होती तिथेही पेट्रोल टाकून त्याने घराला आग लावली. या आगीत पक्षाघात असलेले व घरात झोपलेले त्याचे सासरे देवानंद सितकू मेश्राम (५२) यांचा मृत्यू झाला होता. तर आरोपीची