राजु कापसे
रामटेक
०९ मे २०२४ रोजी हिंगणा,ता.मौदा येथे “आपला आमदार आपल्या सेवी अभियान” अंतर्गत अॅड.आशिष जयस्वाल आमदार वैद्यकीय व दिव्यांग सहाय्यता कक्ष तर्फे निःशुल्क नेत्र तपासणी, मोतिबिंदू तपासणी व मोफत चष्मे वाटप शिबिर हिंगणा येथिल जिल्हा परिषद शाळा येथे आयोजित करण्यात आले होते.
महात्मे हॉस्पिटल नागपुर येथिल तज्ञ डाॅक्टर यांच्या द्वारे नागरीकांची नि:शुल्क नेञ तपासणी करण्यात आली. या शिबिरात एकूण-१३९ लाभार्थीनी लाभ घेतला.मोतिबिंदु ऑपरेशन करिता लाभार्थीं-२४, व चष्मे करिता-११५ लाभार्थी यांनी लाभ घेतला..
या कार्यक्रम प्रसंगी सरपंच – मयुरीताई सुधीर भाकरे,उपसरपंच – श्रीधर पोलिना, गौरव पनवेलकर – शिवसेना वैद्यकीय नागपूर जिल्हाप्रमुख, सुभाष वडे, शालु बेलेकर , सुशीला बागडे, व्यकटलक्ष्मी गारपाती, सागर बावणे,अनिल बोद्रे, यादव वडे, धनराज रहांगडाले, रोशन भाकरे, विकास ढोके, धर्मराज पाटील, सुदर्शन काडे, सतीश काळे, पिंटू पाटील, सिद्धार्थ मेश्राम, विक्की घरडे, रामाराव मधेपाटी, सुधाकर बुरुबली,सत्यनारायण कतपले, रमेश कारर्टुरी, लक्ष्मीनारायण समाद्री, बालू वडे, निखिल कडू,सुमित कामडे व तसेच समस्त गावकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
आमदार आशिष जयस्वाल यांनी "आपला आमदार आपल्या सेवी" अभियान अंतर्गत आमदार वैद्यकीय व दिव्यांग सहाय्यता कक्ष सुरु केलेला आहे.यामध्ये रामटेक विधानसभा मतदार संघातील लोकांसाठी ३६५ दिवस २४ तास वैद्यकीय मदत क्रमांक 7887883377 सुरु केलेला आहे.याद्वारे मुख्यमंञी सहाय्यता निधि,रुग्ण वाहिका सह विविध सुविधा पुरविल्या जाणार आहे.