मुस्लिम समाज बांधवांनी दिले जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन
चंद्रकांत गायकवाड, मालेगाव वाशिम
कारंजा (लाड) ; उस्मानाबाद येथील शिवसेना नेते तसेच माजी खासदार रवींद्र गायकवाड यांनी मुस्लिम समाजाबद्दल एका सभेदरम्यान वादग्रस्त वक्तव्य केल्याने कारंजा येथील मुस्लिम बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्याने गायकवाड यांच्या वर कायदेशीर कठोर कारवाई करावी या करिता पोलीस निरीक्षक, कारंजा यांचे मार्फत जिल्हा पोलिस अधीक्षक, वाशिम यांना मुस्लिम बांधवांच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनात नमूद केले आहे की, शिवसेना नेते तसेच उस्मानाबाद येथील माजी खासदार रवींद्र विश्वनाथ गायकवाड यांनी नुकतेच एका सभेदरम्यान मुस्लिम समुदायाविषयी वादग्रस्त विधान केलेले आहे. त्यांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे मुस्लिम समाजातील नागरिकांच्या भावनेला ठेस पोचली आहे. तसेच नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करून गायकवाड हे मुस्लिम समाजाच्या भावनांना दुखावत आहे. माजी खासदार रवींद्र विश्वनाथ गायकवाड यांनी मुस्लिम समाजातील मुस्लिम समाज बांधव व मुस्लीम मौलाना यांच्या दाढी व टोपी विषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याची एक निनावी टिव्ही चॅनलच्या ब्रेकिंग न्यूज असलेली व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर प्रसारित होत असून या व्हिडीओ क्लिप मध्ये गायकवाड मुस्लिम समाजातील कोणताही मौलाना फतवा काढू शकत नाही, या शहरात फतवा जर कोणी काढू शकतो तो फक्त रवी गायकवाड काढू शकतो असे व्यक्तव्य असून मुस्लिम समाज बांधवांच्या दाढ्या जाळण्याची भाषा प्रसारित होत असलेल्या व्हिडीओ क्लिप च्या माध्यमातून करण्यात येत आहे. करिता सदर प्रकरणाची योग्य ती कायदेशीर चौकशी करून माजी खासदार रवींद्र गायकवाड यांच्यावर त्वरित कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदन सादर करताना माजी नगर सेवक सलीम गारवे,जाकिर शेख, सलीम प्यारेवाले, फारूक अली,जुनेद खान, अ.एजाज, जावेदोद्दीन, यूनुस पहलवान, हाफिज राज, युसुफ खा मौलाना, चांद मुन्नीवाले, शाहबाज खान ,शारिक शेख, उस्मान खान, मुन्नाभाई ठेकेदार, सदिम नवाज़, मुजाहिद खान, मोहसिन शेख, जनेद मिर्ज़ा, अ. रशीद, हामिद शेख, शाइक अहेमद, अरबाज जिलानी, शेख़ अहमद, वहीद शेख यांच्या सह मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो –