राजु कापसे
रामटेक
Ramtek : विदर्भ वनवासी कल्याण आश्रम नागपूर ग्रामीणच्यावतीने पाच दिवसीय निवासी शिबिर श्रीराम विद्यालय रामटेक येथे संपन्न झाले या शिबिराच्या समारोपाला प्रमुख अतिथी डॉक्टर रीना मिरचुले तसेच विशेष निमंत्रित माननीय जयंतराव मुलमुले रामटेक विभाग संघचालक व प्रमुख वक्ता माननीय संजयजी कुलकर्णी पश्चिम क्षेत्र संघटन मंत्री व अ भा वनवासी कल्याण आश्रम सह हितरक्षा प्रमुख कार्यक्रमाचे आयोजक माननीय भास्कर जी रोकडे विदर्भ प्रांत सचिव उपस्थित होते दीप प्रज्वलनाणी कार्यक्रमाला सुरुवात झाली या कार्यक्रमाचे संचालन सौ दिपाली खंडाळे व कु ऋतुजा पाटील यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक माननीय भास्करराव रोकडे यांनी केले कल्याण आश्रमाचा सविस्तर परिचय त्यांनी करून दिला त्यानंतर माननीय प्रमुख अतिथींचे मार्गदर्शन लाभले डॉक्टर रीना मॅडमनी स्व अस्तित्व तयार करण्याकरिता वेळेचे कसे नियोजन करायचे व आपल्या ध्येयपूर्तते करिता विद्यार्थ्यांनी कसे कटिबद्ध व्हायचे हे आपल्या अनुभवातून मार्गदर्शन केले विशेष निमंत्रित माननीय जयंतराव यांनी सुद्धा प्रशिक्षणार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले त्यानंतर वैयक्तिक गीत गायत्री या विद्यार्थिनीने सादर केले त्यानंतर प्रमुख वक्ता माननीय संजयजी कुलकर्णी यांनी ज्ञात अज्ञात आदिवासी क्रांतिकारक यांच्या जीवनावर प्रकाश टाकला आमचा आदिवासी हा कमजोर नाहीच हे आपल्या उद्बोधनातून स्पष्ट केले आदिवासी संस्कृती मुळातच सक्षम आहेत परंतु कालचक्रामुळे संस्कृतीचा वारसा जोपासणाऱ्यांची संख्या कमी होताना दिसते आमचा आदिवासी हा निसर्ग पूजक आहेत त्याच्यामध्ये जन्मजातच अनेक सुप्त गुण दडलेले आहेत फक्त त्याला विसर पडला आहे त्या विसरलेल्या शक्तीची आठवण करून देणारा याची गरज आहे
” तु- मै रक्त एक” या युक्तीच्या आधाराने आपण सर्व एक आहोत आणि हेच कार्य सातत्याने वनवासी कल्याण आश्रम अनेक वर्षापासून प्रकल्पाच्या माध्यमाने करत आहेत आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासाकरिता कल्याण आश्रम निस्वार्थ सेवा करत आहेत अशा प्रकारचे उद्बोधन प्रमुख वक्ता यांनी आपल्या वाणीतून प्रकट केले त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम झाला या कार्यक्रमात प्रशिक्षणार्थ्यांनी आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविले आभार प्रदर्शन श्री प्रकाश चामलाटे यांनी केले कार्यक्रमाला रामटेक नगरातील अनेक परिवार उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वी ते करिता अनेक सज्जन शक्तींनी सहकार्य केले