Sunday, November 17, 2024
Homeराज्यसावकारी निर्मुलनासाठी पतसंस्था चळवळ महत्वाची - डाॅ. लोखंडे...

सावकारी निर्मुलनासाठी पतसंस्था चळवळ महत्वाची – डाॅ. लोखंडे…

जिल्हा पतसंस्था फेडरेशनच्या वतीने आयोजीत प्रशिक्षण

अकोला – संतोषकुमार गवई

शेतकरी आत्महत्याग्रस्थ अकोला जिल्ह्यातील अवैध सावकारी निर्मुलनासाठी अधिकाधिक पतसंस्थाची नोंदणी करणे अवश्यक आहे असे प्रतीपादन अकोल्याचे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था डाॅ प्रविण लोखंडे यांनी केले. अकोला जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशन व जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था अकोला यांचे संयुक्त विद्यमाने शनिवार दि.27 एप्रिल 2024 रोजी अकोला जिल्हयातील पतसंस्थाच्या कर्मचा-यासाठी दै देशोन्नती सभागृह, निशांत टॉवर अकोला येथे एक दिवशीय प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले.

सदर कार्यक्रमाला उदघाटक म्हणुन जिल्हा उपनिबंधक डॉ. प्रविण लोखंडे उपस्थित होते तर अध्यक्ष श्री नारायण आवारे (अध्यक्ष अकोला जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशन) कार्यकमाचे प्रमुख अतिथी म्हणुन प्रा. मुकुंद भारसाकळे साहेब यांची उपस्थिती होती. सुरुवातीला जिल्हा उपनिबंधक प्रविण लोखंडे व जिल्हा फेडरेशनचे अध्यक्ष नारायणराव अवारे आणि मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करुन कार्यकमाचे उदघाटन करण्यात आले. तदनंतर प्रशिक्षण कार्यशाळेला सुरुवात करण्यात आली.

सर्वप्रथम सनदी लेखापाल रमेश चौधरी यांनी “पतसंस्थाकरीता आयकर कायद्यातील तरतुदी” या विषयावर उत्कृष्ट विवेचन केले. त्यानंतर सेवानिवृत्त सहाय्यक निबंधक श्रीकांत खाडे यांनी “सहकार कायदा व नियमातंर्गत संचालकांच्या जबाबदा-या” या विषयावर प्रशिक्षणार्थीना मार्गदर्शन केले. त्याचबरोबर सनदी लेखापाल घनश्यामजी चांडक यांनी “सहकारी पतसंस्थांचे अंतीम लेखे व अंकेक्षण” या विषयावर मोलाचे मार्गदर्शन केले.

स्वरुची भोजनानंतर व्दितीय सत्राला सुरुवात करण्यात आली. यावेळी माजी व्यवस्थापक आर. एस. बोडखे यांनी “कर्जवाटप करतांना घ्यावयाचे दस्तऐवज” या विषयावर मार्गदर्शन केले. अंतीम सत्रात जिल्हा बँकेचे माजी सरव्यवस्थापक व सहकार क्षेत्रातील तज्ञ बाळकृष्ण काळे यांनी “रोखता व तरलता काढण्याची कार्यपध्दती” या विषयावर अभ्यासपुर्वक विवेचन केले. याप्रसंगी उपस्थित विविध पंतसंस्थाचे अध्यक्ष नारायणराव अवारे, जानकीराम वाकोडे, ललीत काळपांडे, उध्दराव विखे, रवि पाटणे, बी जे काळे, पवनीकर साहेब, अशोक नरवाणी, दिनकर घोरड, संजीव जोशी, गणेशराव देशमुख, यांचा जिल्हा उपनिबंधक डॉ. प्रविण लोखंडे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देवुन सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी विविध पतसंस्थांचे अध्यक्ष, विविध पतसंस्थाचे कर्मचारी, अधिकारी, निशांत पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश बाभुळकर, गजानन नागरी पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नंदकिशोर अवारे, जिल्हा फेडरेशनचे उपाध्यक्ष रवि पाटणे, उध्दवराव विखे, विनोद मनवाणी, डॉ. विवेक हिवरे यांचेसह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तावीक बि.जे. काळे यांनी तर सुत्रसंचालन मुरलिधर कारस्कर यांनी केले.

Santoshkumar Gawai
Santoshkumar Gawaihttp://mahavoicenews.com
मी संतोषकुमार गवई पत्रकारितेच्या क्षेत्रात गेल्या ३२वर्षापासून कार्यरत आहे.सकारात्मक विचार मानवी जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणतो म्हणून no negative only & only positive news यावरच माझा विश्वास आहे.संपुर्ण देशात सर्वप्रथम कारगील युध्दाचा 'आँखो देखा हाल'मांडता आला. शोध पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील चांगल्या घटना घडामोडी 'महाव्हाईस 'डिजिटल माध्यमातून समाजासमोर मांडणे हे माझ ध्येय आहे... संतोषकुमार गवई अकोला- 9689142973/9860699890
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: