Delhi Bomb Threat: दिल्ली-एनसीआरमधील अनेक शाळांना धमकीचे ईमेल आले आहेत, ज्यामध्ये शाळा बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. दिल्ली-एनसीआरमधील 100 हून अधिक शाळांमध्ये बॉम्बच्या धमक्या आल्याचे सांगण्यात येत आहे. ज्यामध्ये डीपीएस, एमिटी, मदर मेरी स्कूलसह अनेक मोठ्या शाळांचा समावेश आहे.
दिल्लीतील द्वारका येथे असलेल्या दिल्ली पब्लिक स्कूलला (डीपीएस) बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. पूर्व दिल्लीतील मयूर विहार येथील मदर मेरी स्कूलमध्येही बॉम्बची धमकी मिळाली आहे. त्याचबरोबर पुष्प विहार येथील संस्कृती स्कूल आणि एमिटी स्कूललाही ईमेलद्वारे धमकी देण्यात आली आहे. छावला येथील सेंट थॉमस, सरिता विहारचे जीडी गोएंका, बाबा हरिदास नगरचे एव्हरग्रीन पब्लिक स्कूल आणि द्वारकाच्या सचदेवा ग्लोबल स्कूललाही धमक्या मिळाल्या आहेत.
दिल्लीशिवाय नोएडाच्या दिल्ली पब्लिक स्कूललाही धमकीचा ईमेल आला आहे. त्यानंतर पोलीस आणि शाळा प्रशासन सतर्क झाले. खबरदारी म्हणून मुलांना बाहेर काढण्यात आले. ज्या शाळांमध्ये धमक्या आल्या त्या शाळांमधून मुलांना बाहेर केले आले आहे. पोलीस, बॉम्बशोधक पथक, श्वानपथक आणि अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले आहे. शाळा पालकांना संदेश पाठवत आहेत. मुख्याध्यापक कार्यालयाने पाठवलेल्या संदेशात असे सांगण्यात येत आहे की शाळेला एक ईमेल प्राप्त झाला आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. खबरदारी म्हणून आम्ही विद्यार्थ्यांना तातडीने घरी पाठवत आहोत. खाजगी प्रवाश्यांनी कृपया शक्य तितक्या लवकर तुमच्या मुलाला शाळेच्या आवारातून संबंधित गेटवरून गोळा करण्याची व्यवस्था करा.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, द्वारका येथील दिल्ली पब्लिक स्कूलला धमकीचा ईमेल आला आहे, ज्यामध्ये शाळेत बॉम्ब असल्याचे लिहिले आहे. खबरदारी म्हणून शाळा रिकामी करण्यात आली आहे. दिल्ली पोलीस, बॉम्ब निकामी पथक आणि अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले आहे. शोध सुरू आहे. मात्र, पोलिसांना अद्याप काहीही सापडलेले नाही.
#WATCH | On bomb threat to several schools in Delhi-NCR, DCP South West Rohit Meena says, "We got information that the same email was sent to several schools at around 4:15 am. We took action and made the decision to close the schools and send the students back home. Checking is… pic.twitter.com/Plephu9URT
— ANI (@ANI) May 1, 2024