रुद्ररूपी वादळी वाऱ्याचे पुन्हा आगमन…!
रामटेक – राजु कापसे
रामटेक तालुक्यांतर्गत येत असलेल्या कान्द्री ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या बोन्द्री व हिवरा (बेंडे) येथे पहाटे ४ वाजताच्या सुमारास अचानक आलेल्या वादळी वाऱ्याने घरावरील छत उडवली तर झाड कोसळल्याने झाडाखाली ठेवलेली स्कॉर्पिओ वाहन चकनाचूर झाल्याची माहिती ३० एप्रिलला घडली.
प्राप्त माहितीनुसार, बोन्द्री येथील रहिवासी एकनाथ जागोजी भोयर यांचे डेकोरेशन चे व्यवसाय असून त्यांनी आपल्या राहत्या घरी डेकोरेशनचे साहित्य ठेवले असतांना अचानक पहाटे ४ वाजताच्या सुमारास वादळी वाऱ्याने दखल दिली.व त्यांच्या घरावरील छत वादळाने उडवले.यात त्यांच्या घरी ठेवलेल्या सर्व डेकोरेशनचे साहित्य पाण्यात ओले झाले.यात त्यांचा मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले.
तर दुसरीकडे हिवरा बेंडे येथील रहिवासी नितेश देविदास मेश्राम यांच्या स्कॉर्पिओ चारचाकी वाहनावर अंगणात असलेल्या १०० वर्षांपासून थाटात उभा असलेला विशाल असा चिंचेचा झाड अचानक आलेल्या वादळाने जमिनीतून उखडून झाडाखाली लावलेल्या स्कॉर्पिओ वाहनावर पडल्याने स्कॉर्पिओ पूर्णपणे चकनाचूर झाली असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.घटनेची माहिती पटवारी व संबंधित विभागाला देण्यात आली आहे. तर नुकसानग्रस्त नागरिकांना त्यांच्या झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई देण्याची मागणी बोन्द्री व हिवरा बेंडे येथील नागरिकांनी केली आहे.
अजूनपर्यंत मिळाली नाही नुकसानभरपाई…
गेल्या ३० मार्चला बोरडा सराखा येथे अचानक आलेल्या वादळी वाऱ्याने अनेकांच्या घरावरील छत उडाले होते.प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा तर केला मात्र १ महिना लोटूनही त्यांना त्यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई अजूनही मिळाली नाही.
परत आज ३० एप्रिलला बोन्द्री व हिवरा बेंडे येथील नागरिकांचे वादळी वाऱ्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.आता बोरडा, सराखा,बोन्द्री व हिवरा बेंडे येथील नुकसानग्रस्त नागरिकांना त्यांची नुकसान भरपाई कधी मिळते याकडे लक्ष लागलेले आहे..