Tuesday, January 7, 2025
HomeBreaking NewsLoksabha Election | अमरावती - अकोला लोकसभा मतदारसंघातील टक्केवारी...

Loksabha Election | अमरावती – अकोला लोकसभा मतदारसंघातील टक्केवारी…

Loksabha Election : आज 26 एप्रिलला दुसऱ्या टप्प्याच मतदान होत आहे. सकाळी ७ वाजता पासून मतदानाला सुरुवात झाली आहे. दुसऱ्या टप्प्यात देशातील एकूण 13 राज्य आणि केंद्र शासित प्रदेश मिळून 89 लोकसभा मतदारसंघात मतदान होत आहे. महाराष्ट्रात आज एकूण 8 लोकसभा मतदारसंघात मतदान सुरु आहे.

देशात 18 व्या लोकसभेच्या निवडीसाठी निवडणुका सुरु आहेत. 19 एप्रिलला पहिल्या टप्प्याच मतदान पार पडलं. आज 26 एप्रिलला दुसऱ्या टप्प्याच मतदान होत आहे. मतदानाला सुरुवात झाली आहे. दुसऱ्या टप्प्यात देशातील एकूण 13 राज्य आणि केंद्र शासित प्रदेश मिळून 89 लोकसभा मतदारसंघात मतदान होत आहे. आसाम, बिहार, छत्तीसगड, महाराष्ट्र, जम्मू-काश्मीर, कर्नाटक, केरळ, मणिपूर, मध्य प्रदेश, राजस्थान, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल या भागात मतदानाला सुरुवात झाली आहे.

महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यात एकूण 8 लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. यात विदर्भातील 6 आणि मराठवाड्यातील 2 जागा आहेत. बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड, आणि परभणी या महाराष्ट्रातील आठ लोकसभा मतदारसंघात मतदान सुरु आहे. महाराष्ट्रात सत्ताधारी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना आहे. देशात भाजपा प्रणीत NDA विरुद्ध काँग्रेस प्रणीत INDIA अशी लढत आहे.

अमरावती विभागातील दोन लोकसभा मतदारसंघात दुपारी १.०० वाजेपर्यंत सरासरी ३१.७० टक्के पेक्षा जास्त मतदान पार पडले.

लोकसभा मतदारसंघनिहाय मतदान

०६- अकोला -३२.१५ %
०७- अमरावती -३१.४१%


Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: