एकोडी येथील घटना: अधिकारी घटनास्थळी, अखेर दिले लेखी आश्वासन
एकोडी – महेंद्र कनोजे
गोंदिया तालुक्यातील एकोडी येथील ग्रामपंचायत अंतर्गत करण्यात आलेल्या विविध कामांत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. या कामांची चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्यात यावी या मागणीला घेऊन येथील माजी पंचायत समिती सदस्य जयचंद बिसेन यांनी बुधवारी (दि.२४) गावातील पाण्याच्या टाकीवर चढून विरूगिरी आंदोलन सुरू केले.
जोपर्यंत जिल्हाधिकारी, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी येथे येऊन चौकशीचे लेखी आश्वासन देत नाहीत तोपर्यंत पाणी टाकीवरून खाली उतरणार नाही, अशी भूमिका बिसेन यांनी घेतली होती. अखेर सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास लेखी आश्वासनानंतर जयचंद बिसेन यांनी विरुगिरी आंदोलन मागे घेतले.
जयचंद बिसेन यांनी महिनाभरापूर्वीच जि.प. व पं.स.च्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊन एकोडी ग्रामपंचायत अंतर्गत झालेल्या विविध बांधकामातील भ्रष्टाचाराची चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली होती.
अन्यथा पाणी टाकीवरून उडी मारण्याचा इशारा दिला होता. मात्र, प्रशासनाने याची दखल न घेतल्याने बिसेन यांनी बुधवारी सकाळी ८ वाजता गावातील पाणी टाकीवर चढून विरुगिरी आंदोलन सुरु केले. ही बाब गावकऱ्यांच्या लक्षात येताच एकच गोंधळ उडाला, या घटनेची माहिती
नऊ तासांनंतर आंदोलन मागे
माजी पं.स. सदस्य जयचंद बिसेन यांनी एकोडी ग्रामपं- चायत अंतर्गत करण्यात आलेल्या विविध बांधकामात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करुन यातील दोषींवर कारवाई करण्यात यावी या मागणीला घेऊन बुधवारी (दि.२४) सकाळी ८ वाजता गावातील पाणी टाकीवर चढून विरुगिरी आंदोलन केले. हे आंदोलन सायंकाळी ५ वाजेपर्यंत चालले. जि.प. बांधकाम विभागाचे चौकशी अध..