Friday, January 3, 2025
Homeराज्य२१ वर्षीय मुलीने केली घरात गळफास लाऊन आत्महत्या...

२१ वर्षीय मुलीने केली घरात गळफास लाऊन आत्महत्या…

नांदेड येथे शिकत होती फिजिओथेरपी च्या प्रथम वर्षात…

मालेगाव (वाशिम) – चंद्रकांत गायकवाड

मालेगाव येथील महसुल कॉलनी येथेल रहिवासी असलेल्या डिगांबर आनंदा मोकळे यांच्या २१ वर्षीय मुलीने घरातील फॅनला लटकून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २४ एप्रिल रोजी घडली सदर मुलगी ही फिजिओथेरपी या अभ्यासक्रमाच्या शिक्षणासाठी नांदेड येथे शिकत होती कु.निकिता डिगांबर मोकळे हीचे वडील डिगांबर मोकळे हे राजुरकर विद्यालय राजुरा येथे शिक्षक असून त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांची मुलगी कु.निकिता ही फिजिओथेरपी प्रथम वर्षाला नांदेड येथे शिकत होती.

२२ एप्रिल रोजी ती तिचा प्रॅक्टिकलचा पेपर न देता घरी परत आली होती ती जेव्हा घरी आली तेव्हा ती खूप टेन्शनमध्ये होती तिची आम्ही समजूत काढण्याचा खूप प्रयत्न केला होता.२४ एप्रिल रोजी सकाळी साडेतीन वाजता मी व माझी लहान मुलगी कु.अंकिता ही तिचा पेपर असल्याने तिवसा जिल्हा अमरावती येथे गेलो होतो.

पेपर संपवून दुपारी चार वाजताच्या सुमारास मालेगाव येथे घरी परत आलो असता घराचे दार बंद होते. माझी मुलगी अंकिता ही घरात दार लोटून घरात गेली व लगेच ओरडत बाहेर आली आणि ताईने गळफास घेऊन घेतला असल्याचे घाबरत घाबरत बाहेर येऊन सांगितले. त्यामुळे मी तात्काळ घरामध्ये जाऊन बघितले असता मोठी मुलगी कु निकिता हिने घरातील फॅनच्या हुकला दोरी बांधून गळफास घेतल्याचे दिसून आले मी लगेच तिच्या गळ्यातील गळफास काढून घेतला आणि खाली घेतले व त्वरित मालेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात नेले.

डॉक्टरांनी तपासाअंती तिला मृत्त घोषित केले. या घटनेची फिर्याद त्यांनी मालेगाव पोलिस स्टेशनला दिली पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून मुलीचे प्रेत शवविच्छेदन गृहात पाठवले फिर्यादीवरून व डॉक्टरांच्या अहवालावरून कलम आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास ठाणेदार संजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत मुलीने आत्महत्या का केली ? याबाबत तर्कवितर्क सुरू असुन गुढ मात्र कायम आहे तपास अंती सत्य बाहेर येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे सदर आत्महत्येने मालेगाव शहरामध्ये हळहळ व्यक्त होत आ

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: