Friday, January 3, 2025
Homeराज्यराहुल गांधींच्या विराट सभेने महाविकास आघाडीच्या विजयावर शिक्का मोर्तब डॉ.अभय दादा पाटील...

राहुल गांधींच्या विराट सभेने महाविकास आघाडीच्या विजयावर शिक्का मोर्तब डॉ.अभय दादा पाटील प्रचंड मताधिक्याची आघाडी घेणार…

अकोला :- राहुल गांधी यांनी सांगितलेल्या महालक्ष्मी महिला लखपती योजना, बेरोजगार युवकांसाठी अप्रेंटिस लखपती योजना, शेतकरी कर्जमाफी योजना,एससी, एसटी ओबीसी गरीब समाजाची सत्तेत, नौकरी उद्योग मधील भागिदारी योजनां मतदारांचा कौल वळविण्यात यशस्वी झाल्याचे चित्र सर्वीकडे दिसत आहे.

परतवाडा येथील ऐतिहासिक विराट सभेनंतर अकोला अमरावती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवारांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अकोला लोकसभा मतदारसंघात मतदारांनी निवडणूक हातात घेतली असून परिवर्तनासाठी सर्वजण अग्रेसर असल्याचे दिसत आहे नवे अकोला मतदारसंघात परिवर्तनाची जबरदस्त लाट असून मतदार अभय दादा पाटील यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असल्याचे चित्र आज स्पष्ट झाले आहे.

ही निवडणूक आता जनता विरुद्ध हुकूमशाह अशी असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार युवक, महिला स्वयंप्रेरणेने अभयदादा पाटील यांच्या विजयासाठी मैदानात उतरले आहेत.परिवर्तणासाठी मतदान करायचे असा निर्धार मतदारांनी केला असल्याचे मत राजकीय तज्ञांनी व्यक्त केले आहे.

भ्रष्टाचारामुळे रखडलेल्या अकोट अकोला, देवरी शेगांव रस्त्यांमुळे शेकडो प्राण गेले,शरीराचे,गाड्यांचे अणगिणत नुकसान झाले असे असतांना लोकप्रतिनिधी बघ्याची भूमिका घेत होते.

मतदार ,नागरीकांना कवडीमोल समजणाऱ्या लोकप्रतिनिधींना मतदाराची ताकद दाखविण्याची ही संधी आहे आणि याचमुळे अकोला लोकसभा मतदारसंघात परिवर्तन होणार हे निश्चित होतेच त्यात परतवाडा येथील राहुल गांधीच्या सभेने भर घातली असून डॉक्टर अभय दादा पाटील यांच्या विजयावर शिक्का मुहूर्त झाल्याचे सगळीकडे बोलले जात आहे कोणी कितीही अफवा पसरविल्यात तरी सर्व अफवांना पायदळी तुडवत मतदार अभय दादांनाच निवडून देणार असल्याचे सर्वत्र नागरिक बोलताना दिसत आहेत.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: