Sunday, September 22, 2024
Homeराज्यलोकसभा निवडणुकीत डॉ.अभय पाटील समवेत महाविकास आघाडीचे उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून येतील...

लोकसभा निवडणुकीत डॉ.अभय पाटील समवेत महाविकास आघाडीचे उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून येतील – नाना पटोले…

अकोला – राज्यातील महाविकास आघाडीसाठी ही लोकसभा निवडणूक अत्यंत महत्त्वाची असून महाविकास आघाडीच्या सर्व राज्यातील उमेदवारांना मतदारांचा सर्वत्र पाठिंबा मिळत असून त्यांचे जागोजागी उस्फुर्त स्वागत करण्यात येत आहे.

ही या उमेदवारांच्या विजयाची नांदी असून अकोला लोकसभा मतदारसंघातही डॉ अभय पाटील हे मोठ्या अंतराने निवडून येणार असल्याचा विश्वास प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी व्यक्त केला. महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ अभय पाटील यांच्या प्रचारार्थ नानाभाऊ पटोले यांची जाहीर सभा शनिवारी अकोट येथे संपन्न झाली.

या सभेत महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांनी हजेरी लावली. पटोले यांनी यावेळी राज्यातील महायुतीच्या शासनावर आपले वैचारिक हल्ले चढवत या निवडणुकीनंतर महायुतीचे राज्यातील सरकार नाहीसे होणार असल्याचा दावा यावेळी व्यक्त केला. महायुतीच्या उमेदवारांना या निवडणुकीत मतदार त्यांची जागा दाखवणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. पटोले यांनी यावेळी काँग्रेसचा वचननामा सादर केला.

काँग्रेसच्या वचननामात अठरा पगड जाती जमातीच्या विकासाची हमी देण्यात आली आहे. या जाहीरनाम्यात युवक,महिला, बेरोजगार, व्यापारी, उद्योजक पासून तर कष्टकरी कामकरी,कामगार, मजूर,शेतकरी, दलित, आदिवासी व समाजाच्या अंतिम टोकाच्या घटकापर्यंतच्या विकासाची हमी देण्यात आली आहे.

यासाठी केंद्रात सत्ता स्थापनेसाठी डॉ अभय पाटील यांना निवडून देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. त्यांनी यावेळी स्थानिक मुद्द्यांनाही आपल्या भाषणात हात घातला. अकोट- अकोला रस्त्याच्या संदर्भात त्यांनी राज्याच्या महायुती शासनाच्या नाकर्तेपणाचा निषेध केला.

या सभेत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर, ज्येष्ठ काँग्रेस नेते हिदायत पटेल, माजी राज्यमंत्री रामदास बोडखे, एड महेश गणगणे, प्रा संजय बोडके, प्रशांत पाचडे, नानासाहेब हिंगणकर, अनोख राहणे, डॉ प्रमोद चौरे, दिलीप बोचे, सारंग मालानी समवेत काँग्रेस प्रणित महाविकास आघाडीचे बहुसंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते व मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: