सांगली प्रतिनिधी:–ज्योती मोरे.
सांगली जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांच्या कामांची गुणवत्ता आणि दर्जा चांगला राखून काम वेळेत पूर्ण करणं आवश्यक असून,जर ती कामं मुदतीत आणि गुणवत्ता पूर्ण झाली नाहीत, तर ठेकेदारांना दंड आकारण्यात येईल.असा इशारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुड्डी यांनी दिलाय.
पाणी पुरवठा योजनेतील ठेकेदार आणि अभियंत्यांसाठी आयोजित बैठकी दरम्यान ते बोलत होते. या आढाव बैठकीत ज्या तालुक्यांची प्रगती कमी आहे,त्या तालुक्यांचा गावनिहाय आढावा घेण्यात आला. काम गुणवत्ता पूर्ण होण्यासाठी शाखा अभियंता श्री विश्वास कदम यांनी उपस्थित यांना मार्गदर्शन केले.