अकोला:-अकोला अकोट डेमू रेल्वे मार्गावर असलेल्या पूल, अंडरपास,भराव अशा जवळपास अकरा ठिकाणी स्पीड का कमी करून धावते तेंव्हा साहजिकच प्रश्न पडतो की रेल्वे रुळाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाले आहे कां? सुरू होऊन दीड वर्षाचा कालावधी होऊनही स्पीड का कमी करावा लागतो याचे समाधानकारक उत्तर मिळत नाही तोपर्यंत कामाचा दर्जा संशयाच्या भोवऱ्यात आहे हे निश्चित.
२०१४ ला गडकरी मंत्री झाल्यानंतर प्राधान्यक्रमाने अकोट- अकोला ,शेगाव- देवरी, अकोट -परतवाडा रस्ता काॅंन्क्रेटीकरन करण्याची मोठ्या थाटामाटात घोषणा करण्यात आली व उद्घाटन म़त्री, मुख्यमंत्री , खासदार ,आमदार यांच्या उपस्थितीत पार पडले. अकोला जिल्ह्यातील अकोट बाजारपेठ व तालुका इतर तालुक्यांपेक्षा विकसित आर्थिकतेने संपन्न आहे. नवीन रस्त्याने अकोट तालुक्याचा अधिक विकास होईल अशी आशा या निमित्याने नागरिकांमध्ये पल्लवीत झाली होती. 2019 ची निवडणूक आली आणि यामध्येही याच आशेवर जनतेने कौल दिला पण केंद्र सरकारचा दहा वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाला तरीसुद्धा हा रस्ता अद्यापही हिचकी देत आहे.
या दुरावस्थेतच दुष्काळात तेरावा महिना म्हणावा तसा पूर्णा नदीवरील इंग्रज कालीन पहिला काँक्रीट पूल शत्रिग्रस्त झाला याला तडे गेले आणि चक्क अकोटचा अकोलाशी संपर्क तुटला विशेष म्हणजे रेल्वे मार्गही तयार होता आणि पर्यायी मार्गावर चार ब्रिज मोठ्या दिमागाने उभे होते. असे असून सुद्धा एवढ्या मोठ्या तालुक्याचा जिल्ह्याशी संपर्क तुटला. अकोल्याला दर्यापूर व बाळापूर मार्गाचा वापर करण्याची पाळी जनतेवर आली. स्वतःला आर्थिक भुर्दंड ही घेतला एवढेच नव्हे तर 70 रुपयाचे एसटीचे भाडे 140 रुपये दिले.सहनशील आकोटकरांनी हे सर्व सहन केले. यामुळे शासनाचा नाकर्तेपणा उघड झाल्याने घाई गडबडीत चार कोटी चा पूल बनविण्यात आला. आणि भ्रष्टाचाराने लदबद असलेला हा पूलही पुरात वाहून गेला आणि पुन्हा एकदा अकोट अकोला संपर्क तुटला. जनतेचा संताप पाहून प्रशासनाने अकोट अकोला डेमू रेल्वे सुरू करण्याचा निर्णय घेतला.
23 सप्टेंबर 22 ला अकोला अकोट रेल्वे सुरू झाली मोठा गाजा वाजा जाहिराती ,झेंडी दाखवून शुभारंभ झाला.वाहून गेलेल्या चार कोटी पुल व अर्धवट असलेल्या आकोट अकोला रस्त्यावरून थोडे का होईना पण यामुळे जनतेचे लक्ष दुसरीकडे वळविण्यात यश आले. रेल्वे मार्गाची तांत्रिक तपासणी होऊनही या मार्ग नविन असल्याने रेल्वेचा स्पीड कमी ठेवण्यात आला. काही दिवसात स्पीड वाढविण्यातील असा मेसेज जनतेपर्यंत पोहोचविण्यात आला. पण स्पिड वाढण्या ऐवजी एक तास वीस मिनिट घेणारी रेल्वे पाऊस आल्यानंतर पावणेदोन तास घेऊ लागली पावसाने बांधकामातील उनिवा उघड केल्या की काय अशी शंका आणि रेल्वे मार्गाच्या निकृष्ट कामाबाबत जनतेत रोषही व्यक्त होऊ लागला.
रेल्वे रुळांमधील काही तांत्रिक दुरुस्त्या केल्यानंतर रेल्वे अकोट अकोला 40 मिनिटात पोहोचेल असे मेसेजही जनतेपर्यंत पोहोचविण्यात प्रशासन यशस्वी झाले मात्र तांत्रिक दुरुस्ती केल्यानंतर रेल्वे एक तास दहा मिनिट हा अवधी घेऊन आजपर्यंत धावत आहे. अंडर बायपास, नदी, नाल्या वरील पूल तसेच मोठे भराव आले की रेल्वेचा स्पीड अतिशय कमी होतो. 23 सप्टेंबर 22 पासून आज पर्यंत हीच अवस्था आहे. दिड वर्षांनंतर तिकीट तिस वरुन दहा रुपये करून जनतेला चकमा देण्याचा हा प्रयत्न नसावा ना अशी शंका यानिमित्ताने व्यक्त होत आहे.दिड वर्ष झालीत पण एव्हढे मोठे स्टेशन असतांना ना रिझर्व्हेशन ची, ना पास काढण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली नाही.दहा रूपये तिकीट झाल्याने खासगी तिकीट विक्री कमीशन कमी मिळत असल्याने बंद पडणार नाही याची काळजी तरी प्रशासनाने घेणे आवश्यक आहे.