Vivo T3x 5G : Vivo ने भारतात नवीन स्मार्टफोन Vivo T3x 5G लाँच केला आहे. हा फोन तीन रॅम पर्यायांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. फोनची विक्री भारतात 24 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता सुरू होईल. फोनमध्ये 6000mAh बॅटरी आहे. तसेच फोन ड्युअल स्टीरिओ स्पीकर्स सह येतो. याशिवाय, फोनमध्ये Snapdragon 6 Gen 1 सारखा शक्तिशाली चिपसेट आहे. ज्याचा Antutu स्कोअर 5.5 लाखांपेक्षा जास्त आहे.
कीमत, स्पेसिफिकेशन्स, कैमरा आणि बैटरी
- 4GB + 128GB – 13,999 रुपये
- 6GB + 128GB – 14,999 रुपये
- 8GB + 128GB – 16,499 रुपये
Vivo T3x स्मार्टफोनमध्ये 6.7 इंच फुलएचडी प्लस डिस्प्ले असेल, ज्याचा रिफ्रेश रेट सपोर्ट 120Hz असेल. तसेच, फोनला 1000 nits ची पीक ब्राइटनेस मिळेल. फोन IP64 रेटिंगसह येतो. तसेच फोनमध्ये ड्युअल स्टीरिओ स्पीकर देण्यात आले आहेत. फोन 3.5mm ऑडिओ जॅक सह येतो.
तुम्हाला Vivo T3x स्मार्टफोनमध्ये Snapdragon 6 Gen 1 मिळेल. फोनमध्ये 8 जीबी रॅमसह 8 जीबी व्हर्च्युअल रॅम आहे. याच्या मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. त्याचा मुख्य कॅमेरा 50MP आहे. याशिवाय आणखी 2MP कॅमेरा देण्यात आला आहे.
Mark your calendars and get ready for some #turbo action! The sale of the much-anticipated vivo T3X 5G begins on 24th April at 12 PM. Are you ready to #GetSetTurbo ?
— vivo India (@Vivo_India) April 17, 2024
Click on the link below to pre-book now.https://t.co/O1xh0DgrYJ pic.twitter.com/nwoSAfMSOx
तसेच फोनच्या समोर 8MP सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये 6000mAh बॅटरी आहे, ज्यासोबत 44W फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. 6000mAh बॅटरी असूनही, फोनचे वजन 199 ग्रॅम आहे, तर फोनची जाडी 7.99mm आहे. फोन Android 14 ऑपरेटिंग सिस्टमसह येतो.