Rajsthan Accident : सीकर जिल्ह्यातील फतेहपूर शेखावती येथील आशीर्वाद चौकाजवळील पुलावर रविवारी दुपारी कार आणि ट्रक यांच्यात झालेल्या धडकेत कारमध्ये प्रवास करणारे सात जण जिवंत जळाले. कारमध्ये दोन मुले आणि तीन महिलांसह सात जण होते.
मिळालेल्या माहितीनुसार, पुलावर कार पुढे जाणाऱ्या ट्रकला धडकली. अपघातानंतर कारने पेट घेतला ही आग एवढी भीषण होती की काही वेळातच आगीने कारला कवेत घेतले आणि कारमधील लोकांना बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही.
#Sikar: ट्रक और कार की भिड़ंत के बाद लगी आग में 4 लोग जिंदा जले#Sikar #Rajasthan #Accident @SikarPolice pic.twitter.com/CTUTcN1a8u
— पक्की ख़बर (@Pakki_khabarr) April 14, 2024
पोलिस उपअधीक्षक (फतेहपूर सर्कल) रामप्रताप बिश्नोई यांनी सांगितले की, कारमधील सर्व लोक मेरठ, उत्तर प्रदेशचे रहिवासी होते. सालासर बालाजी मंदिराकडून हिसारकडे जात होते. यादरम्यान त्यांचा अपघात झाला.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि त्यांनी अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. कारमधील मृत प्रवाशांची ओळख अद्याप पटलेली नाही. घटनास्थळी उपस्थित असलेले फतेहपूर शेखावती पोलीस मृताची ओळख पटवण्यात व्यस्त आहेत.