Saturday, September 21, 2024
Homeराज्यसिंधी व मुस्लिम बांधवांना देवानंद पवार यांनी दिल्या शुभेच्छा...

सिंधी व मुस्लिम बांधवांना देवानंद पवार यांनी दिल्या शुभेच्छा…

कारंजा लाड – चंद्रकांत गायकवाड

झुलेलाल जयंती निमित्त प्रदेश काँग्रेस चे सरचिटणीस व वाशिम जिल्हा काँग्रेस चे प्रभारी देवानंद पवार यांनी सिंधी कॅम्प येथे उपस्थित राहुन झुलेलाल महाराजांचे दर्शन घेऊन सिंधी बांधवांना शुभेच्छा दिल्या यानंतर आयोजित रक्तदान शिबिराला भेट देऊन उपस्थित युवक व सिंधी बांधवांशी तसेच रक्तदान शिबिराचे समन्वयक नितीन नागवाणी व वाशिम जिल्ह्यात ज्यांनी नेत्रदान व रक्तदान चळवळ रुजवली असे प्रज्वल गुलालकरी, डॉ. सुशील देशपांडे , डाॅ.राम गुंजाटे, डाॅ. उल्हास काटोले यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला.

यावेळी काँग्रेस कार्यकर्त वासुदेव कटारीया व आयोजकाच्या वतीने देवानंद पवार यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. महिन्याभर रोजे ठेवल्यानंतर मुस्लिम बांधव मोठ्या उत्साहात पवित्र रमजान ईद साजरी करतात या रमजान ईद निमित्त काँग्रेस नेते देवानंद पवार यांनी ईदगाह वर उपस्थित राहुन मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या.

सिंधी व मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देतांना प्रदेश सचिव दिलीपभाऊ भोजराज, जिल्हा सरचिटणीस ॲड. संदेश जैन जिंतुरकर, पंचायत राज विभागाचे काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष ॲड. वैभव ढगे, शहर कॉग्रेस अध्यक्ष अमीर खान पठाण, शहर अल्पसंख्याक काँग्रेस चे अध्यक्ष युसुफ भाई जट्टावाले, शहर काँग्रेस सेवादल चे अध्यक्ष ॲड. वैभव लाहोटी, स्वप्नील तायडे, सलमान खान, फैजल खांन पठाण, यासिन पठाण उपस्थित होते.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: