नांदेड – महेंद्र गायकवाड
कंधार तालुक्यातील मौजे हळदा शिवारात दोन वेगवेगळ्या शेतात दोन शेतकऱ्यांनी ज्वारीच्या पिकात गांजाच्या झाडांची लागवड केली असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या पथकाने महसूलच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन एकूण 27 किलो 50 ग्राम गांजा जप्त करून दोन आरोपीस ताब्यात घेतले आहे.
उस्माननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये मौजे हाळदा ता. कंधार शिवारात एका शेतामध्ये एन डी पी एस कायदयाच्या तरतुदीचा भंग करून अंमली पदार्थ गांजाचे झाडाची लागवड करुन जोपासलेली आहेत अशी खात्रीशिर माहीती स्थागुशाचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांना माहीती मिळाल्यानंतर त्यानी हि माहिती वरीष्ठांना देवुन त्यांच्या आदेशाने स्थागुशाचे पोलीस अमंलदार, महसुलचे राजपत्रीत अधिकारी यांना सोबत घेवुन दिनांक 8 एप्रिल रोजी मिळालेल्या माहीतीचे ठिकाणी,
मौजे हाळदा ता. कंधार शिवारात गट नंबर 675 मधील शेतात ज्वारीच्या पिकात एकुण 13 लहान मोठे गांजाचे झाडे ज्याचे वजन 8 किलो 700 ग्राम लागवड करुन जोपासलेली एकुण किंमती 43500/- रुपयाचे मिळुन आल्याने आरोपी नामे बजरंग नागोराव बुरपल्ले वय 40 वर्ष व्यवासाय शेती रा. हाळदा ता. कंधार याचेविरुध्द पोलीस ठाणे उस्माननगर येथे गुरनं. 56/2024 कलम 20(b)ii (b) NDPS ACT प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे,
तसेच नमुद शिवारातच गट क्रं. 636 मधील शेतात ज्वाराचे पिकात एकूण 34 लहान मोठे गांजाचे झाडे ज्याचे वजन 18 किली 350 ग्राम लागवड करुन जोपासलेली एकुण किमती 91,750/- रुपयाचे रुपयाचे मिळून आल्याने आरोपी नाम माधव शंकर मंदावाड वय 40 वर्ष व्यवासाय शेती रा. हाळ्दा ता. कंधार पाचेविरुध्द सहा. पोलीस निरीक्षक रवि वाहुळे स्थागुशा नांदेड यांच्या फिर्यादीवरुन पोलीस ठाणे उस्माननगर येथे गुरनं. 57/2024 कलम 20 (b)ii (b) NDPS ACT प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे,अपर पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार खंडेराव धरणे, अपर पोलीस अधीक्षक, भोकर यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय, नायब तहसीलदार डी. डी. लोढे, सपोनि रवि वाहुळे, चंद्रकांत पवार, पोउपनि आनंद बिचेवार, गाढेकर, सपोउपनि माधव केंद्रे,
पोह गंगाधर कदम, गुंडेराव करले, रुपेश दासरवार, पोना संजिव जिंकलवाड, विठ्ठल शेळके, देवा चव्हाण, मोतीराम पवार, तानाजी येळगे, बालाजी यादगीरवाड चालक हेमंत बिचकेवार, कलीम शेख बालाजी मुंडे स्थागुशा, यांनी पार पाडली आहे.