नांदेड – महेंद्र गायकवाड
शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने एका विधिसंघर्षित बालकास ताब्यात घेऊन त्याने चोरलेल्या वेगवेगळ्या कंपनीच्या 19 सायकली असा एकूण 1,47,000 रुपयांच्या सायकली हस्तगत केल्या आहेत.
शिवाजीनगर पोलीस ठाणे येथे 3 एप्रिल रोजी गुन्हा रजिस्टर क्र 118/2024 कलम 379 भादंवि चा गुन्हा दाखल होता. पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, उप विभागीय पोलीस अधिकारी उप विभाग नांदेड शहर किरतिका मॅडम यांनी नांदेड शहरातील सायकली चोरी करणाऱ्या चोरट्यांचा शोध घेवुन जास्तीत जास्त गुन्हे उघडकीस करने बाबत्त पोलिसांना आदेशीत केले होते.
त्यानुसार शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जालींदर तांदळे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी, व अमलदार यांना मिळालेल्या गोपनिय माहितीचे आधारे गुन्ह्यातील विधीसंघर्षीत बालक यास दिनांक. 4 एप्रिल रोजी ताब्यात घेवुन त्याचे ताब्यातुन सदर गुन्ह्यातील favron कंपनीची सायकल व पोलीस ठाणे शिवाजीनगर हद्दीतुन तसेच नांदेड शहरातुन ईतर ठिकाणाहुन चोरलेल्या वेगवेगळ्या कंपनीच्या 19 सायकली असा एकुण 1,47,000 रुपयेच्या सायकली हस्तगत करुन उत्कृष्ट कामगीरी केली आहे
सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, तसेच उप विभागीय पोलीस अधिकारी किरतीका सी.एम. मॅडम पोलीस निरीक्षक जालीदर तांदळे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथक प्रमुख पोलीस उप निरीक्षक मिलिंद सोनकांबळे व पोहेकॉ रविशंकर बामणे, पोकों देवसिंग सिंगल, शेख अझरोदीन, दत्ता वडजे, राहुल लाठकर, लिंबाजी राठोड, अंकुश लंगोटे, यांनी पार पाडली.