निसर्गातील विविध पाना-फुलांपासून बनविले सुंदर रंग…
रामटेक – राजू कापसे
होळी हा समस्त भारतीयांचा सण मानला जातो. भारतात होळीनिमित्त रंगोत्सव उत्साहात साजरा केला जातो पण बाजारातील रासायनिक पदार्थयुक्त रंगांच्या वापरामुळे अनेकांना डोळ्याचे अंधत्व, त्वचेचे विकार यासारख्या संकटांचा सामना करावा लागतो. वसंत ऋतूमध्ये निसर्ग विविध फुलांनी बहरून आलेला असतो.
याच महिन्यात होळीच्या सण आपण साजरा करतो. अश्यावेळी निसर्गात सहज उपलब्ध असणाऱ्या पाना-फुलांपासून घरगुती पद्धतीने निसर्गपुरक रंग तयार करून विद्यार्थ्यांवर पर्यावरण संरक्षण व संवर्धनास पूरक संस्कार करण्याच्या उदात्त हेतूने राष्ट्रीय आदर्श विद्यालय शिक्षण मंडळ या संस्थेचे सचिव मयंकराव देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली २३ मार्चला राष्ट्रीय आदर्श विद्यालय व कनिष्ठ कला महाविद्यालय नवेगाव खैरी ‘निसर्गपुरक रंग निर्मिती कार्यशाळा’ घेण्यात आली.
याप्रसंगी शाळेतील राष्ट्रीय हरित सेना व निसर्ग मित्र मंडळाचे संयोजक शिक्षक साक्षोधन कडबे यांनी पलाश, जास्वंद, काटेसावर यांची फुले, रानमेहंदी, पालकभाजी, गाजर, बीट, कडूनिंब व आंब्याची पाने यांच्या पासून पाण्यात वापरायचे रंग तसेच चंदन पावडर, मुलतानी माती, मक्याचे पीठ, बेसन, हळद यापासून पावडर आणि पेस्ट स्वरूपात वापरायचे रंग तयार करण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविले.
या उपक्रमात आवळेघाट येथील जि.प. प्रा. शाळेचे विद्यार्थी आवर्जून उपस्थित होते. शाळेतील इयत्ता पाचवी ते अकरावीतील सर्व विद्यार्थ्यांनी कार्यशाळेचा लाभ घेतला. कार्यशाळेचे अध्यक्ष शाळेचे ज्येष्ठ शिक्षक राजीव तांदूळकर यांनी शुभेच्छापर मार्गदर्शन केले. यावेळी शिक्षक नीलकंठ पचारे, प्रशांत पोकळे, दिलीप पवार, शैलेंद्र देशमुख, सतीश जुननकर, सौ. तारा दलाल, अमित मेश्राम, सौ. अर्चना येरखेडे, प्रा. अरविंद दुनेदार, प्रा. सुनील वरठी,
प्रा. मोहना वाघ उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी निसर्गदूत चांदणी सूर्यवंशी, अपेक्षा कोरचे, किरण पारधी, आर्या ढोरे, खुशी खंडाळे, दिपांशू पंधराम, रुचिका धूर्वे, दिव्यांनी शेंदरे, हर्ष डोंगरे, विवेक गजभिये, अनिकेत पुरकाम, प्रणय आरसे, मोहित चक्रवर्ती, सारंग भलावी, प्रणित इनवाते, रोहित मुंगभाते, वैभव सहारे,
वंशिका ठाकरे, वंशिका सावरकर, प्रणव ढोंगे, सक्षम सोनेकर, दिशा करमकर यांनी प्रयत्न केले तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी गोविंदा कोठेकर, लिलाधर तांदूळकर, राशिद शेख, मोरेश्वर दुनेदार यांनी सहकार्य केले.