नांदेड – महेंद्र गायकवाड
बिलोली तालुक्यातील येसगी येथील जुगारअड्डा व बिलोली शहरातील मटक्या विरोधात प्रसिद्धी माध्यमातून बातम्या येताच पोलिसांनी येसगी फाटा जवळ चालणाऱ्या मटका व जुगार चालवीणाऱ्या विरुद्ध मोठी कारवाई करीत दोघांकडून जवळपास दहा हजार रुपये व जुगाराचे साहित्य ताब्यात घेतले असून बिलोली पोलीस ठाण्यात त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. परंतु लाखो रुपयांची उलाढाल असलेल्या जुगारअड्डा चालक व बिलोली शहरातील मटका व जुगार चालवीणाऱ्या विरुद्ध कारवाई कधी होणार…?असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
बिलोली तालुक्यातील अवैध धंदयाविरोधात प्रसार माध्यमातून लिखाण करण्यात आले होते.तालुक्यातील येसगी येथे चालू असलेल्या जुगार अड्डयात महाराष्ट्र व तेलंगणातुन अनेक आंबटशौकीन जुगार खेळण्यासाठी येत असून या जुगारअड्डावर दररोज लाखोंची उलाढाल होत असून जुगार चालकांची लाखो रुपये कमाई होत आहे. तसेच बिलोली शहरात मध्यवस्तीत असलेल्या मटकाकिंग च्या घरात सुद्धा दररोज लाखो रुपयांची के. टी. निघत आहे.
मटका किंग हा संपूर्ण शहरात खुले आम मटक्याच्या बुकी चालवीत असून जुगार व मटक्या विरोधात गेल्या दोन दिवसापासून प्रसिद्धी माध्यमातून लिखाण सुरु आहे. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी व बिलोली पोलिसांनी येसगी फाटा येथे बिना परवाना चालत असलेल्या मटका चालकांकडून नगदी 4160 रुपये व जुगार चालवीण्याचे साहित्य ताब्यात घेतले सदरील मोठी कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे मधुकर टाणगे यांनी केली तर मांजरा नदी येसगी फाटा ब्रिज जवळ चार आरोपी जुगार खेळवीत असताना तांच्याकडून नगदी 6040 रुपये व जुगाराचे साहित्य ताब्यात घेण्यात आले.सदरील मोठी कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब नरवटे यांनी केली असून मटका व जुगार खेळविणाऱ्या विरुद्ध बिलोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई झाल्यानंतरही नंतरही मुजोर जुगारअड्डा चालक व मुजोर मटका, जुगार चालकाकडून आपला धंदा बंद ठेवण्यात आला नाही. प्रसारमाध्यमातून कितीही बातम्या आले तरी आमचे कांही वाकडे होणार नाही या तोऱ्यात हि चांडाळचौकडी वागत असल्याचे दिसून येते या जुगारअड्डा चालक व मटकाचालक यांच्यावर कारवाई कधी होणार याकडे सर्व जागरूक नागरिकांचे लक्ष लागले आहे. कलम 144 लागू असतानाहि मोठ्या प्रमाणात मटकाचालकाच्या घरी व जुगारअड्यात मोठया संख्येने आंबटशौकीन खेळण्यासाठी येतात हे मात्र विशेष.