जनता त्रस्त….नव्याने स्कॅनिंग करण्याची मागणी
मालेगाव (वाशिम) – चंद्रकांत गायकवाड
मालेगाव/नागेश अवचार:- जनतेच्या सोईसाठी मालेगाव तहसील कार्यालयावर संकेतस्थळावर कोतवाल बुक नक्कल,फरफार, सात बारा,आठ अ काढल्या जातात. परंतु काही नक्कल चुकीच्या पद्धतीने स्कॅनिंग केल्यामुळे काळ्या येत आहेत.त्यामुळे नागरिकांना नाहक भुर्दंड व त्रास होत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,वाशीम जिल्ह्यातील मालेगाव तहसील मध्ये ऑनलाईन पद्धतीने कोतवाल बुक नक्कल,फेरफार, सात बारा आठ अ काढण्यासाठी मशीन ठेवलेली आहे.परंतु त्या मशीन मधून निघणाऱ्या नक्कल काळ्या येत असल्यामुळे sdo कर्यालायामधून रेजेक्ट करण्यात येतात.
त्यामुळे नागरिकांना याचा नाहक भुर्दंड व त्रास सहन करावा लागत आहे.अशाप्रकारची तक्रार ऍड.संघनायक मोरे यांनी तहसीलदार यांना केली आहे.तक्रारी मध्ये नमूद केले आहे की नक्कल स्कॅन करण्याची जबाबदारी असणाऱ्या इजेन्सी माहिती देवून पुन्हा नव्याने नक्कल स्कॅन करण्यात याव्या.