नांदेड – महेंद्र गायकवाड
बिलोली तालुक्यात चालणारे अवैध जुगार अड्डे, मटका, अवैध रेती उत्खनन, अवैध गुटखा विक्री, अवैध दारू विक्री सारखे धंदे बंद करून हे धंदे चालवीणाऱ्या विरुद्ध कारवाई करावी व बिलोली पोलीस ठाण्याला सक्षम पोलीस निरीक्षक द्यावा अशी मागणी जनतेतून होत आहे.या संदर्भात लवकरच एक शिष्टमंडळ जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांची भेट घेणार असल्याची माहिती एका संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.
महाराष्ट्र व तेलंगणाच्या सीमेवर असलेल्या बिलोली तालुक्यातील परिसरात व बिलोली, कुंडलवाडी शहरात अनेक अवैध धंदे चालत असून या अवैध धंद्यामुळे सुशिक्षित, बेरोजगार, गोरगरीब, मजूरवर्ग भरकटला जात असून अनेकांचे आर्थिक नुकसान होत आहे. व कांहीजन व्यसनी बनत आहेत.
महाराष्ट्र व तेलंगणाच्या सीमेलगत असलेल्या येसगी-कार्ला फाटा येथे एक मोठा जुगार चालू करण्यात आला असून बिलोली शहरात हि अनेक ठिकाणी जुगार अड्डे चालू आहेत. या जुगार अड्डयात व मटक्याच्या धंदयात कांही राजकीय वरदहस्त असलेले व्यक्ती असल्याने आमचे कांही वाकडे होणार नाही अशा अशा तोऱ्यात मटका चालक व जुगार चालक वागत आहेत.
बिलोली शहरात अनेक ठिकाणी खुलेआम मटक्याच्या बुकी चालू असून अनेक निवदने व तक्रारी देऊनही कांही उपयोग होत नाही.कुंडलवाडी शहरातील अवैध धंदे बंद करण्याची मागणी हि शिवसेना शिंदे गटाने केली आहे.
बिलोली तालुक्यात खुलेआम चालणारे अवैध जुगार अड्डे, मटका, अवैध रेती उत्खनन, अवैध गुटखा विक्री, अवैध दारू विक्री सारखे धंदे बंद करून हे धंदे चालवीणाऱ्या विरुद्ध कारवाई करावी व बिलोली पोलीस ठाण्याला सक्षम पोलीस निरीक्षक द्यावा अशी मागणी जनतेतून होत आहे