अकोला लोकसभा मतदार संघ हा भाजपचा गड आहे येथे गेल्या 4 लोकसभेत भाजपच वर्चस्व राहिले आहे अकोला लोकसभेचे लोकप्रिय खासदार संजय धोत्रे हे लोकनेते म्हणून प्रसिद्ध आहेत मात्र त्यांची तब्बेत बरी नसल्याने यावेळी त्यांच्या मुलाला अनुप धोत्रेला भाजप ची उमेदवारी मिळाली सोबतच वंचित बहुजन आघाडीने अगोदरच आपले लोकसभेचे उमेदवार जाहीर केले आहेय.
मात्र महाविकास आघाडी सोबत वंचितची जागावाटपा बाबत बोलणी अध्यापही झालेली नसल्याने काँग्रेसच्यावतीने डॉ.अभय पाटील यांनी तयारी सुरू केली आहेय तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाने सुद्धा आपली तयारी सुरू केली आहेय.. ठाकरे गटाच्यावतीने पक्ष कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराला तिकीट मिळाल्यास जोमाने काम करू तर स्वतंत्रपणे लढण्याची वेळ आली तर आपला उमेदवार कशा प्रकारे विजय होईल यावर मार्गदर्शन करण्यात आलं.. मात्र एकीकडे प्रकाश आंबेडकरांनी अकोला लोकसभा निवडणूक लढणार असल्याची घोषणा आधीच केली असून, शिवसेना उद्धव ठाकरे सुद्धा अकोल्याची जागा मागणार असल्याचं आमदार नितीन देशमुख यांच्या वक्तव्याने वंचित आणि महाविकास आघाडीची आघाडी नेमकी होणार की नाही यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित झालाय.
मात्र अजूनही अकोला लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात जागावाटपाचा तालमेल काही दिसत नसताना आता युती होणे शक्य नसल्याचे समजते तरआघाडीच्या वतीने जिल्ह्यात प्रतिष्ठित डॉक्टर समाजसेवी अभय पाटील यांना काँग्रेस उमेदवारी मिळणार असल्याचे जोरदार चर्चा सुरु आहे डॉक्टर अभय पाटील यांचे जिल्ह्यात एक वेगळी ओळख आहे.त्याचं जिल्ह्यातील गावोगावी कार्यकर्ते व चाहते, मित्र मंडळी मोठ्या प्रमाणात असल्याने महाविकास आघाडी अकोला लोकसभेसाठी भक्कम मन्ल्या जात आहे.
काल मुंबईत राहुल गांधी यांची न्यायात्राची समाप्तीचा दिवस असल्याने वंचित आघाडीचे सर्व सर्व प्रकाश आंबेडकर हे उपस्थित होते मात्र तेथे कोणतीही जागा वाटपाबद्दल बद्दल तोडगा निघाला नसल्याचे माहिती पडत आहे तर उद्या महाविकास आघाडी आपला उमेदवार जाहीर करतील अशी अनेक राजकीय तज्ञांची मत आहे तर अकोला जिल्ह्यात एकमेव असा सर्व समाजांना चालणारा व्यक्ती म्हणून डॉक्टर अभय पाटील यांची निवड करतील अशी अनेकांना आशा आहे.
मात्र वंचित ने आघाडी सोबत युती केली तर ही जागा बाळासाहेब आंबेडकर यांच्यासाठी सोडल्या जाईल त्यामुळे भाजपच्य्चा उमेदवाराला ही निवडणूक जड जाणार असल्याचं राजकीय तज्ञांचे मत आहे.