सन्मान योजनेची रक्कम ११ हजरावरून २० हजार करण्याचा जीआर आला..!
अजुन निकष सुधार व सर्वसमावेशक धोरण होणे बाकी…
मुंबई – गणेश तळेकर
दि. १५ बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजनेतून निवृत्त पत्रकारांना देण्यात येणा-या सन्मान योजनेची दरमहा देण्यात येणारी रक्कम ११ हजारावरून २० हजार करण्यात यावी, तसेच योजनेतील निकष सुधारावेत जेणेकरून, हा लाभ सर्वसमावेशक होईल अशी मागणी तत्कालिन एनयुजेमहाराष्ट्र अध्यक्ष आणि वर्तमान मीडिया असोसिएशन ऑफ इंडियाच्या संस्थापक अध्यक्ष शीतल करदेकर व सहकाऱ्यांनी सातत्याने लावून धरली होती.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालय वार्ताहर संघाच्या सोहळ्यात सन्मान योजनेची रक्कम ११ हजार ऐवजी २० हजार करण्याची घोषणा केली होती.आज राज्य सरकारने त्या संदर्भातील शासन निर्णय ( जीआर) जारी केला आहे.
त्यामुळे आता निवृत्त ज्येष्ठ पत्रकारांना दरमहा २० हजार रूपये निवृत्ती वेतन मिळणार आहे. त्यासाठी मीडिया असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री शंभूराज देसाई यांचे आभार व्यक्त केले आहेत.
नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंत्रालय विधिमंडळ वार्ताहर संघ अध्यक्ष प्रमोद डोईफोडे,कार्यवाह प्रविण पुरो आणि मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया च्या अध्यक्ष व कोषाध्यक्ष चेतन काशीकर यांनी याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह मंत्र्यांना जाब विचारून घेराव घातला होता.
नेत्रहीन राज्यभरात संपर्क अभियान राबवून मीडिया असोसिएशन ऑफ इंडियाचे (माई)सरचिटणीस डॉ सुभाष सामंत व पदाधिकारी तसेच सदस्यांनी हा विषय मंत्रालयासह राज्यस्तरावर लावून धरला! अखेर आज राज्य सरकारने सन्मान योजनेची रक्कम ११ हजाराऐवजी २० हजार ₹ करण्यासंदर्भातील शासन निर्णय ( जीआर) जारी केल्याने राज्यातील जेष्ठ पत्रकारांना मोठा दिलासा मिळाला असला तरी अंमलबजावणी योग्य प्रकारे होणे अत्यावश्यक आहे,
तसेच क्लिष्ट निकषात सुधारणा होणे गरजेचे आहे तर पत्रकाराचा खरा सन्मान झाला असे म्हणता येईल!
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री शंभूराज देसाई यांच्याह मुख्यमंत्र्यांचे माध्यम सल्लागार विनायक पात्रुडकर यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहेत!
तसेच हा पत्रकार एकीचाचा विजय असून या विषयाचे मार्गदर्शक ज्येष्ठ पत्रकार मा योगेश त्रिवेदी याचेही आभारी आहोत, याचे पत्रकार दिल्लीपर्यत उमटून देशातील पत्रकाराचा उचित सन्मान होइल असे माई च्या अध्यक्ष शीतल करदेकर यांनी सागितले.