Friday, January 3, 2025
Homeराज्यकवरदरी येथे वीजेचा शाॅक लागुन युवकाचा मृत्यु...

कवरदरी येथे वीजेचा शाॅक लागुन युवकाचा मृत्यु…

मृतक किन्हिराजा येथिल रहिवासी

मालेगाव (वाशिम) – चंद्रकांत गायकवाड

किन्हिराजा येथिल युवक कवरदरी येथिल मंदिरात वीज फिटींगचे काम करत असतांना ११ केव्ही च्या जिवंत वीज ताराला स्पर्श झाल्याने त्याचा घटनास्थळी मृत्यु झाल्याची घटना १४ मार्च रोजी दूपारी ५ वाजेदरम्यान कवरदरी येथे घडली.

मालेगांव तालुक्यातील किन्हिराजा येथिल प्रभाग ५ मधिल रहिवासी मुबस्सिर शाह जावेद शाहा (१९) हा वीज फिटींगचे काम करुन आपला उदर निर्वाह करतो.१४ मार्च रोजी मुबस्सिर हा कवरदरी येथे नव्याने बांधण्यात आलेल्या श्री संत सेवालाल महाराज यांच्या मंदिराची वीज फिटींगचे काम करण्याकरिता कवरदरी येथे गेला होता.

मंदीरावर वीज फिंटीगचे काम करत असतांना मंदीराजवळून गेलेल्या ११ केव्ही च्या जीवंत वीज तारेला त्याच्या हातातील स्र्पिंगचा स्पर्श झाल्याने त्याला वीजेचा जोरदार धक्का लागल्यामुळे तो बेशुध्द पडला. बेशुध्द अवस्थेत त्याला त्याच्या साथिदारांनी किन्हिराजा येथिल आरोग्यवर्धीनी केंद्रात उपराकरिता आणले असता डाॅक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

मुस्लिम बांधवांचा रमजानचा महिणा सुरु असुन आज त्याचा तीसरा दिवस आहे. त्यामुळे मुबस्सिरला रोजा सुध्दा होता.मुबस्सिरच्या अशा अपघाती मृत्यु मुळे समाज बांधवामध्ये हळहळ व्यक्त केल्या जात आहे.वृत्त लिहेपर्यंत पोलीसात कुठल्याच प्रकारच्या गुन्हाची नोंद करण्यात आली नव्हती.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: