डिजीटल शिवकथा आरोग्य शिबिर पालखी सोहळा काल्याचे कीर्तन…
नया अंदुरा – अमोल साबळे
स्वयंभू महादेव संस्थान, अंत्री मलकापूर येथे दरवर्षी प्रमाणे यावर्षीही भव्य अशा महाशिवरात्री उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. २ मार्च ते ९ मार्च २०२४ पर्यंत आयोजित या उत्सवामध्ये देवाधीदेव महादेव ही शिवकथा डिजीटल स्क्रीनवर दररोज सायं. ७ ते १० या वेळात भाविकांसाठी असणार आहे.
दि. ८मार्च २०२४ रोजी सकाळी ८ ते १० या वेळात भव्य आरोग्य शिबीर घेण्यात आले. त्यामध्ये पुण्याच्या डॉ. अर्चना लोंढे ह्या हार्ट पेशंटसाठी अत्यंत उपयुक्त अशा किलेशन थेअरपीसाठी मार्गदर्शन करणार आहेत तसेच डॉ. भारती देठे यांचे मार्गदर्शन ह्या शिवाय डॉ. आरती पाटील ह्या मूळव्याधी सारख्या समस्यांवर सल्ला दिला तसेच डॉ. विठ्ठल पाटील रोगांवर सल्ला दिले आहेत.
तसेच डॉ. प्रफुल्ल वाघाडे हे विविध प्रकारच्या त्वचा रोगांवर सल्ला देणार आहेत. या सर्व तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याचा लाभ परिसरातील सर्व नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन संस्थानच्या वतीने करण्यात आले होते. ८ मार्च रोजी भव्य पालखी सोहळ्याचे करण्यात आले वारकर्यांचे रिंगण हे त्यामध्ये विशेष वैशिष्ट्य असणार आहे. शनिवार दि.९ मार्च रोजी सकाळी १० वाजता ह.भ.प. महेश महाराज मारवाडी यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे.
त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. स्वयंभू महादेव संस्थान, अंत्री मलकापूरच्या महाशिवरात्रीला भव्ययात्रा व पंचक्रोशीतील नागरिकांनी एकच गर्दी केली होती उत्सवात परिसरातील भाविकांनी सहभागी व्हावे असे आवाहन मंदिराचे अध्यक्ष अरविंद देठे तथा महाशिवरात्री समिती, सांप्रदायिक भजनी मंडळ, आरती मंडळ, युवा व समस्त भगिनी तथा सर्व गावकरी मंडळीने केले होते.