Sunday, December 22, 2024
Homeराज्यसावरगांव येथे दोन दिवसीय शंकरपटात धावल्या २६७ बैलजोड्या, हिवरासंगम येथील लक्ष्या व...

सावरगांव येथे दोन दिवसीय शंकरपटात धावल्या २६७ बैलजोड्या, हिवरासंगम येथील लक्ष्या व राणा यांनी मारली बाजी…

नरखेड – अतुल दंढारे

नरखेड तालुक्यातील सावरगाव येथील समस्त गावकरी शंकर पट कमिटी वतीने आयोजित स्व.पांडुरंगजी दाढे, स्व.गंगाधर आप्पाजी हवाले, स्व.पुरुषोत्तमजी गाण, स्व. केशवराव धानपाले, स्व.नत्थुजी तांदळे यांचे स्मृतीप्रित्यर्थ शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते.पटाचे दुसरे वर्ष असून पश्चिम महाराष्ट्र व मध्यप्रदेशासह नामांकित बैलजोड्या शंकर पटात सहभागी झाल्या.हा शंकर पट 3 व 4 मार्चला ललित रेवतकर यांचे शेतात संपन्न झाला.

सोमवारी जनरल गट,शो पल्ला, तालुका गट अश्या एकूण तीन गटात झालेल्या शंकर पटात एकुण 54 पुरस्कार करीता रविवारी 128 तर सोमवारी 139 बैलजोड्यां धावल्या हा थरार बघण्यासाठी महीला,पुरुष,शेतकर्‍यांची उपस्थिती होती.
यावेळी उद्घाटन माजी ऊर्जा मंत्री मंत्री व महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,

भाजपा काटोल विधानसभा अध्यक्ष चरणसिंग ठाकूर,भाजपाचे अरविंद गजभिये,कामठी विधानसभेचे आमदार टेकचंद सावरकर,माजी आमदार सुधाकर कोहळे,संदीप सरोदे,सतिश रेवतकर, समीर उमप, माजी आमदार आशिष देशमुख,शंकर पट कमेटीचे अध्यक्ष प्रफुल हवाले, बाजार समिती संचालक मनिष फुके,

जिल्हा परिषद सदस्या सौ. पार्वतीबाई काळबांडे,न.प.नरखेडचे माजी उपाध्यक्ष अजय बालपांडे,पट कमेटीचे राहुल रेवतकर,गौरव रेवतकर,रवी दाढे,दिलीप तांदळे,मंगेश गाण व सदस्य यांच्या उपस्थित संपन्न झाला.

हिवरासंगमचा लक्ष्या व राणा यांनी 236 बैलजोड्यांत चित्तथरारक प्रदर्शन करीत पहिला क्रमांक पटकावला,शर्यतीचा हा क्षण श्वास रोखणारा होता.जनरल अ गटात हिवरासंगम जिल्हा यवतमाळ साहेबराव पाटील यांच्या लक्ष्या-राणा या जोडीने 5.33 सेकंदाचे अन्तर कापून प्रथम क्रमांक पटकावला,साई येथील सोपिनाथ देवस्थान यांच्या माही- देवाभाई जोडीने 5.49 सेकंद अन्तर कापून दुसरा क्रमांक तर तिसरा धारपड यवतमाळ येथील अशोक पाटील यांच्या बंन्सी-बजरंग जोडीने 5.52 सेकंदात अन्तर पार केले.

शो पल्ला गट प्रथम क्रमांक आतिश शर्मा वाशिम, दुसरा क्रमांक रामदास पाटील गुमनी वर्धा, तालुका गट पवन निंबाळकर येणीकोणी,समिर पठाण सावरगांव यांचा समावेश आहे,शंकर पटात घड्याळ चालक उल्लास दाभाडे, विजय आकरे, धनराज चौधरी यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली.याप्रसंगी महिला धुरकरी कुमारी लक्ष्मी सोनबावने रा.येवती जिल्हा अमरावती व इतर धुरकरी यांना बक्षिस वितरण करण्यात आले.

विजयी जोडीला पटाचे अध्यक्ष प्रफुल हवाले,जयंत दाढे,पुरूषोत्तम बोडखे,मनिष फुके,सौ.पार्वतीबाई काळबांडे,सौ.सुनिता रेवतकर,निंबाजी गवळी,पंकज मेटांगळे, एकनाथ रेवतकर,मौजु पठाण,ओमप्रकाश रेवतकर,सुरेश मेंढेकर,सुरेश हिरूडकर, शंकर पटाचे उपाध्यक्ष मंगेश गाण,सचिव गौरव रेवतकर,संयोजक राहुल रेवतकर, दिलीप तांदळे यांचे हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.

यशस्वीतेसाठी राहुल रेवतकर,रवींद्र दाढे,गौरव रेवतकर,दिलीप तांदळे,उमेश गिरडकर,मोरेश्वर मेटांगळे,राहुल तु.रेवतकर,सुनील रेवतकर,ओमप्रकाश तांदळे,दिनेश कावडकर,हुसेन शेख,गुणवंत बेलखडे,सतिश बालपांडे,ललित तांदळे,नंदु घाटोडे,समस्त गावकरी शंकर पट कमेटी सदस्य व इतरांनी सहकार्य केले.यावेळी प्रास्ताविक राहुल रेवतकर, संचालन दिलीप तांदळे यांनी केले.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: