अहेरी – मिलिंद खोंड
महाशिवरात्रीचे औचित्य साधून दिनांक 8 मार्च 2024 रोज शुक्रवारला प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय माउंट आबू( राजस्थान) च्या सौजन्याने बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन सोहळा खास भद्राचलम येथून आणलेल्या बारा ज्योतिर्लिंगाच्या मूर्तीचे दर्शन व अभिषेक तीर्थ प्रसादाचे वाटप वांगे पल्ली घाटावरील शिव मंदिराजवळ होत आहे.
यावर्षी पहिल्यांदाच महाशिवरात्रीनिमित्त भारतातील बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन एकाच ठिकाणी लाभत असल्यामुळे भक्त गणात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे एक भक्तिमय सोह ळा पहिल्यांदा अहेरी उपविभागात होत आहे. तरी भाविकांनी याचा लाभ घ्यावा अशी विनंती आयोजकांनी केली आहे.