मूर्तिजापूर राष्ट्रवादीचे माजी तालुका अध्यक्ष व माजी आमदार तुकारामभाऊ बिडकर यांचे कट्टर समर्थक तथा सहकारी श्रीकृष्ण बोळे यांच्यासह अनेकांनी आज अकोल्यात वंचित बहुजन आघाडीच्या सर्वेसर्वा बाळासाहेब आंबेडकर यांच्याहस्ते वंचित पक्षात प्रवेश घेवून राजकीय धक्का दिला आहे. शिक्षकीपेशापासून ते राजकीय क्षेत्रात कार्यरत असून तालुक्यातील OBC नेत्यांमध्ये त्याच मोठ आदराच स्थान आहे.
त्यांची गेल्या काही दिवसांपासून वंचित आघाडीत प्रवेश करणार अश्या चर्चा सुरु असताना त्यांनी आज असंख्य कार्यकर्त्यासह अकोला येथील जि. प. विश्रामगृह येथे उपस्थित ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत प्रवेश केला यावेळी अक्षय सुरेश जोगळे, तालुका महासचिव मुर्तिजापूर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
श्रीकृष्ण बोळे सर यांनी कोणत्याही राजकीय लालसेपोटी त्यांनी वंचित प्रवेश केला नसून या पक्षाचे विचार त्यांना पटले असल्याने त्यांनी प्रवेश केला असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. यांच्यासह वंचित मध्ये सामील होणारे कार्यकर्ते त्र्यंबक उर्फ बाळु सातींगे, योगेश सोळंके, शेरीफ भाई, हयाद भाई, शेमशोद्दिन भाई, तसेच हातगाव येथील अनेक तरुणांनी वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रवेश केला. यावेळी वंचित मध्ये प्रवेश करणार्यांचे सर्वांचे अभिनंदन व स्वागत अक्षय सुरेश जोगळे, तालुका महासचिव मुर्तिजापूर यांनी केले.