नांदेड – महेंद्र गायकवाड
नांदेड शहरातील कांही भागात संध्याकाळी भूकंपाचा धक्का बसल्याची चर्चा ऐकावयास मिळाल्यानंतर नागरिकांत संभ्रमाचे व भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. प्रशासनाकडून प्राथमिक अहवाल सादर करण्यात आला असून नागरिकांनी भयभीत होऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे.
नांदेड शहरातील शिवाजी नगर, आय टी आय परिसर, विवेक नगर, श्रीनगर या सह कांही भागात भूगर्भातून आज दिनांक 3 मार्च रोजी सायंकाळी 6.18 मिनीटांनी आवाज आल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी नियंत्रण कशाला दिली त्यानुसार स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीथाचे प्राध्यापक डॉ. टी. विजयकुमार यांना माहिती विचारली असता भुकंपमापक यंत्रावर या धक्क्यांची नोंद 1.5 रिश्टर स्केल एवढी झालेली आहे. असा प्राथमिक अहवाल श्री. विजयकुमार सर यांनी नियंत्रण कक्षाला कळविला आहे. .