Sunday, December 22, 2024
Homeगुन्हेगारीपातूर | अपघात झालेल्या तरुणीचा उपचार दरम्यान मृत्यू...

पातूर | अपघात झालेल्या तरुणीचा उपचार दरम्यान मृत्यू…

कुटूंबातील उद्याचा लग्न सोहळा पुढे ढकलला…
सस्ती गावात शोककळा

पातूर – निशांत गवई

पातूर तालुक्यातील सस्ती येथील वर्षा विनायक शेळके वय ३३ ही तरुणी कापसी येथून मंगळवार रोजी पूरवठा विभागाची परीक्षा देऊन वडीलासोबत घरी परत जाताना दिग्रस बु बसस्थानक जवळील गतिरोधक वर गाडी उसळून खाली पडून गँभिर जखमी झाली होती.

तिला दिग्रस बु येथील वंदना गवई,ओम ताले,महेश धोत्रे ,रवी ताले अनंता ताले यांनी उचलून रस्त्याच्या बाजूला करून वाडेगाव येथील रुग्णवाहिका संपर्क करून पुढील उपचार साठी पाठविण्यात आले होते.

खाजगी दवाखान्यात उपचार दरम्यान २ मार्च शनिवार रोजी अंतिम श्वास घेतला.गावात या घटनेने शोककळा पसरली होती.तसेच या तरुणीने नुकतीच तलाठी परीक्षा उत्तीर्ण झाली होती.व कुटूंबात मोठ्या बहिणीचे ४ मार्च ला असलेले लग्न पुढे ढकलण्यात आले आहे. हा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: